श्रीगोंद्यात ट्रॅक्टरला दुचाकीची धडक, शिक्षिकेचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :रस्त्यावर अंधारात थांबलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात अरुणा राजेंद्र शेळके (वय ३८,रा. शिरसगाव बोडखा ता.श्रीगोंदा) या शिक्षिकेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि.२६ ऑगस्ट रोजी सांयकाळी सात ते आठच्या दरम्यान नगर-दौड रोडवर मढेवडगाव जवळ झाली.


फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

सविस्तर माहिती अशी की, शेळके हृया अहमदनगर येथे आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी दुपारी त्यांच्या (एमएच १६,बीटी ९१२२) या स्कूटीवरुन गेल्या होत्या. आणि सायंकाळी नगरवरुन काष्टी कडे येत असताना, मुरुमाने भरलेला ट्रॅक्टर (एमएच १६,एफ ९१०३) हा ट्रॉलीसह मढेवडगाव जवळ डिजेल संपल्याने रस्त्यावर उभा होता. समोरुन येणाऱ्या वाहनाची लाईट जास्त असल्यामुळे शेळके यांना समोरचा रस्त्यावरील उभा असलेला ट्रॅक्टर न दिसल्यामुळे त्यांची स्कूटी गाडीची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर मागील बाजूने जोराची धडक बसली.

आणि त्यांच्या डोक्याला आणि उजव्या खांद्याला जबर मार लागून त्या जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी त्यांच्या पर्समधील ओळखपत्रावरून या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून मयत शेळके यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. शवविच्छेदनानंतर मध्यरात्री दीड वाजता मूळगावी शिरसगाव बोडखा येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यस्कार करण्यात आले.

शेळके या काष्टी येथे शिक्षक कॅलनीत राहत होत्या. गावात नवीन बंगल्याचे काम चालू होते. ते पूर्ण करुण लवकरच गृहप्रवेश करण्यापूर्वीच नियतीने घात केला. त्यांच्या पश्चात पती राजेंद्र शेळके हे रयत शिक्षण संस्थेच्या बेलवंडी विद्यालयात उपशिक्षक आहेत. त्यांना दोन लहान मुले आहेत.

अतिशय हुशार, अभ्यासू व विनोदी शिक्षिका गेल्यामुळे येथील विद्यार्थी व शिक्षकांनी हळहळ व्यक्त केली. या अपघाता बाबत पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.