मिटर तपासणीसाठी आले अन् चोरी करून गेले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :घरातील विजेचे मिटर तपासणीसाठी आलो असल्याची बतावणी करत.अज्ञात दोघा चोरांनी पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी येथील एका शेतकऱ्याचे संपूर्ण घरच साफ केल्याची घटना दगडवाडी येथे नुकतीच घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दगडवाडी येथील शेतकरी काळे यांच्यावस्तीवर दोघेजन मोटारसायकल वरून आले, आणि घरामधील मिटर तपासण्याचा बहाना करत त्यांनी घरातील सर्व मौल्यवान वस्तू घेवून तेथून पळ काढला. त्यावेळी जवळच शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याने विचारले तपासले का मिटर? त्यावेळेस या अज्ञात चोरांनी मिटर व्यवस्थीत तपासले असल्याचे सांगत तेथून धूम ठोकली.

जाहिरात - फ्लिपकार्ट वर मिळावा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN

त्यानंतर काही वेळाने घरी आलेल्या घरमालकीणीने घरात प्रवेश केल्यानंतर घरी कोण आले होते ? कोणी एवढी उचकापाचक केली. अशा शब्दात आरडाओरडा केल्याने नेमकं काय घडलं म्हणून शेजारी पाजारी देखील त्या ठिकाणी आले असता. तेव्हा समजले की दोघा अज्ञात चोरांनी घरातील वीजमिटर तपासणीचा बहाणा करून घरात चोरी केल्याची घटना घडली असल्याचे लक्षात आले. ग्रामीण भागामध्ये दररोज वाड्या वस्त्यांवर विजेचे घरगुती मिटर तपासणीसाठी वीज कंपनीमार्फत खाजगी कॉन्ट्रक बेसवर अनेकजन काम करत आहेत.

मात्र त्याचाच गैरफायदा काही अज्ञात चोरटे घेत असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. त्यामुळे वीजमंडळाने देखील यापुढील काळात अशा घटना घडू नये म्हणून अधिकृतपणे मिटर तपासणी करणाऱ्या व्यक्तीस ओळखपत्र देण्याची खरी गरज आता निर्माण झाली आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.