अकोल्यात विहीरीत पडलेला बिबट्या जेरबंद.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भक्ष्याच्या शोधार्थ भटकंती करणारा बिबट्या शुक्रवारी रात्री विहीरीत पडला होता. मात्र त्याला वेळीच मदत मिळाल्याने बिबट्या वाचला. माळीझाप (अकोले) या शिवारात हा प्रकार घडला. पडलेला हा बिबट्या दोन वर्षे वयाचा असावा. आज दुपारी वन खात्याच्या पिंजऱ्यात तो जेरबंद झाला.

अकोले येथील सिद्धेश्वर दूध संस्थेचे व्यवस्थापक रामनाथ मंडलिक यांच्या विहीरीत हा बिबट्या पडल्याचे आज सकाळी श्री मंडलिक यांना सांगण्यात आले. त्यांनी तातडीने हा प्रकार वन खात्याला कळवला. त्यानंतर विभागीय वनाधिकारी जयश्री पोले यांनी याबाबत तातडीने पावले उचलली.

बघ्यांना आवरणे वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना अवघड झाले. शेवटी विहीरीत पडलेला हा बिबट्या रात्री पाण्यात भिजून कुडकडल्याने कपारीत बसला होता. त्याला हाकारे घालून तो बाहेर येईना. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी विहीरीला काट्याचे कुंपण घातले व विहीरीत शिडी सोडली.

शेवटी अखेरच्या हाकाऱ्यानंतर गारठलेला बिबट्या शिडी चढून वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात स्वतः होऊन अडकला. वन कर्मचारी शेडगे, घोडसरे, पुंडे, वाकचौरे आदींनी हा पिंजरा सुगाव रोपवाटिकेत आणला. तेथे त्याची आवश्‍यक ती काळजी घेतली जात आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.