पिंपळागाव पिसा येथे तालुकास्तरीय मुलींच्या खो खो स्पर्धा संपन्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :काल संपन्न झालेल्या तालुकास्तरीय मुलींच्या खो खो स्पर्धा अंतिम सामना रेणुकादेवी, इंदिरा गांधी व नागवडे विद्यालयास विजेतेपद यावेळी पारितोषक वितरण समारंभ डॉ. सौ. प्रणोती (माई) राहुल जगताप, विश्वस्त कुकडी एज्युकेशन सोसायटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.


यावेळी अँड. ऋषीकेश गायकवाड तालुका अध्यक्ष युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस, सुमनताई मोरे - सरपंच पिंपळगाव पिसा, प्रमोद जगताप - मा. सरपंच पिंपळगाव पिसा, बाळासाहेब जगताप, रामदास कुताळ व कॉलजचे प्राचार्य शिंदे सर आणि सिनीअर कॉलजचे प्राचार्य घेगडे सर आदि मान्यवर उपस्थित होते.

तालुक्यातील सर्व क्रिडा शिक्षकांचे खेळाडूंना उत्तम मार्गदर्शन मिळाले. यावेळी विजेत्या संघाचे डॉ. सौ. प्रणोती (माई) राहुल जगताप व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. 

यावेळी बोलताना डॉ. सौ. प्रणोती जगताप यांनी ''मुलींनी शिक्षणासोबत खेळामध्ये देखील प्रगती करावी, खेळामध्ये देखील करीअर करण्याच्या मोठी संधी आता उपलब्ध आहे. त्यासाठी परिश्रम करण्याची तयारी असावी. विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे तसेच गावाचे नाव मोठे करावे. तसेच सर्व विजेता संघाचे अभिनंदन तसेच क्रिडा शिक्षकाचे व या सामन्यांसाठी ज्यांनी मदत केली, सामने यशस्वी करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचे मनपुर्वक आभार व पुढिल जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विजेत्या संघाना शुभेच्छा दिल्या.

१४ वयोगटातील मुलींच्या खो-खो अंतिम सामन्यात श्रीगोंदा फॅक्टरी येथील इंदिरा गांधी निकेतन विजेतासंघ ठरला तर रेणुका देवी विद्यालय पिंपळगाव पिसा उपविजेता ठरला. तृतीय क्रमांक राजापुर येथील महात्मा गांधी विद्यालय राजापुर यांनी पटकाविला.

१७ वर्षे वयोगटामध्ये अंतिम सामन्यात रेणुका देवी विद्यालय पिंपळगाव पिसाने विजेते पद पटकाविले तर उपविजेता श्रीगोंदा फॅक्टरी येथील इंदिरा गांधी निकेतन संघ ठरला, राजापुर येथील महात्मा गांधी विद्यालयास तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

१९ वयोगटात अंतिम श्री शिवाजीराव नारयणराव नागवडे विद्यालयास विजेतपद तर रेकुकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव पिसा संघाला उपविजेतपद मिळाले.

उत्कृष्ट खेळाडू म्हणून कु. ऋषाली चव्हाण, कु. निकीता जंबे, कु. रेणुका काळे (रेणुका देवी), कु. प्रियंका गजर, कु. शेजल कोळपे (नागवडे)

पिंपळगाव पिसाच्या खेळाडूंनी बहारदार खेळ करुन प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेत २१ ज्युनिअर कॉलेज व विद्यालयातील सुमारे २६० खेळाडूंनी भाग घेतला. पंच म्हणुन प्रा. रविंद्र शिर्के, अशोक कांडेकर, अशोक गायकवाड, सोमनाथ गायकवाड, अनिस शेख, बाळु कोळपे, यांनी काम पाहिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.