विखे कुटुंबाकडून विकासकामे करताना गटा-तटाचे व जाती पातीचे राजकारण नाही.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यानी लोक कल्यानाची कामे करण्याचा जो आदर्श घालून दिला आहे. त्यानुसार विखे कुटुंबा कडून विकासकामे करताना कोणत्याही गटा-तटाचे व जाती पातीचे राजकारण केले जात नाही. केद्रं व राज्य शासनाची प्रत्येक योजना ही कार्यकर्त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकापर्यत पोहचवण्याचे प्रामाणिक काम सुरु आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील यानी केले.

संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथे पतंप्रधान उज्वला योजनेतील लाभार्थी महिलाना गँस वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाजीराव शिदें होते. यावेळी संगमनेर पंचायत समिती सदंस्य निवृत्ती सांगळे, बापुसाहेब गुळवे, गोकूळ दिघे, अकुंशराव कांगणे, रघुनाथ शिदें, ग्रा. सदंस्या मोरे, लाभार्थी महिला व ग्रामस्थं उपस्थित होते.

                                 

यावेळी ना. शालिनीताई विखे पाटील यानी नागरिकाना गणपती उत्संवाच्या शुंभेच्छां दिल्या. तर गँसचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे ही असल्याने महिलानी गँस बाबत संपूर्ण माहिती घेऊन त्याचा सुरक्षित वापर करावा व महिला बचत गटासाठी शासन विविध योजना मार्फत उद्योंग उभारणीसाठी मदत करत असून त्याचा लाभ परिसरातील महिलानी घ्यावा,समाजकल्याण विभागाच्या विविध योजनाची माहिती देत ना. शालिनीताई विखे यानी स्थानिक कार्यकर्त्यानी योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळून देण्यासाठी कागदपत्राची पुर्तता करत पाठपुरावा करावा अशा सुचना दिल्या.

दरम्यान गावातील घरकुल मजुंर झालेल्या लाभार्थी कुटुंबाना शासकीय जागा, ग्रामपंचायत कार्यालयाला सुसज्य इमारत, बसण्यासाठी बाकडे व लोकसंख्या वाढीमुळे पिण्याच्या पाण्याची टाकी मिळावी अशी मागणी रहिमपुर ग्रामस्थांनी ना. शालिनीताई विखे पाटील याच्याकडे केली आहे.याप्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आश्वी कार्यालयायाचे जनसंपर्क अधिकारी भारतराव गिते यानी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.