शेतक-यांनी 15 सप्‍टेंबर पर्यंत शेतकरी सन्‍मान योजनेसाठी अर्ज करावेत


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्‍मान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्‍याची प्रक्रिया सुरु आहे. या योजनेसाठी अर्ज करण्‍याची मुदत 15 सप्‍टेंबर, 2017 पर्यंत असून या मुदतीच्‍या आत शेतक-यांनी अर्ज करावेत, असे आवाहन सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्‍थेच्‍या मिरजगांव शाखेचे इमारतीचे उदघाटन सहकारमंत्री सुभाष देशमख यांच्‍या हस्‍ते झाले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाराष्‍ट्र राज्‍याचे जलसंधारण व राजशिष्‍टचार, विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याणमंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे होते. यावेळी कर्जतचे नगराध्‍यक्ष नामदेव राऊत, मिरजगांवचे सरपंच नितीन खेतमाळस, विजय देशमुख, राजेंद्र देशमुख, पतसंस्‍था फेडरेशनचे अध्‍यक्ष काकासाहेब कोयटे आदि उपस्थित होते.

सहकार मंत्री श्री. सुभाष देशमुख म्‍हणाले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्‍मान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्‍याची प्रक्रिया गतीने सुरु आहे. आपले सरकार, नागरी सुविधा केंद्र, संग्राम केंद्र आणि काही ठिकाणी जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्‍थेतील केंद्राचा समावेश आहे.

शेतक-यांनी 15 सप्‍टेंबर, 2017 च्‍या आत या योजनेसाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन करुन देशमुख म्‍हणाले, सभासदांच्‍या हितापासून, ठेवीदारांच्‍या संरक्षणासोबतच कर्ज देतांना कर्जदारांचाही विचार पतसंस्‍था करतात. पतसंस्‍थेच्‍या माध्‍यमातून सामान्‍य लोकांची पत निर्माण होते. त्‍यामुळेच पतसंस्‍थांना संरक्षण देण्‍याचे काम राज्‍य सरकार करेल असे ही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे म्‍हणाले, पारदर्शक, गतीमान व सर्वसामान्‍य शेतक-यांना दिलासा देणारा कर्ज माफीचा निर्णय सरकारने घेतला आहे. कर्ज माफीचा निर्णय घेतांना सर्वसामान्‍य शेतकरी हाच केंद्रबिंदू राहीला आहे. असे सांगतांना कर्जत व जामखेड तालुक्‍यात जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातून पथदर्शी काम झाले असल्‍याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले.यावेळी पतसंस्‍थेचे सभासद, नागरीक मोठया संख्‍येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.