कोल्हारमध्ये भरदिवसा घरफोडी तीन लाखांचा ऐवज लंपास.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहाता तालुक्यातील कोल्हारमधील लक्ष्मीबाई कुंकूलोळ कॉम्प्लेक्समध्ये भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून काल चोरी झाली. विद्या चंद्रशेखर कवळे- निंभोरे शिक्षिकेच्या फ्लॅटमधून दोन लाख रोकड, चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. 

राहाता तालुक्यातील कोल्हार येथे बेलापूर रस्त्यावर लक्ष्मीबाई कुंकूलोळ वसाहत आहे. येथे दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान घरात कुणीही नसताना चोरट्याने डाव साधला. घराचे मालक चंद्रशेखर कवळे हे त्यांच्या कामासाठी अकोले येथे गेले होते तर शिक्षिका असलेल्या विद्या निंभोरे-कवळे लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या होत्या.

दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास घराचे कुलूप चोरट्याने तोडले. घरात जाण्यापूर्वी चोरट्याने शेजारी उघडे असलेल्या शिक्षक बनकर यांच्या घरास बाहेरून कडी लावली. बाजूचे दोन्ही फ्लॅट बंद होते. त्यानंतर अवघ्या २० ते २५ मिनिटात बैठकीतील कपाटातून १५ हजार तर बेडरूममध्ये असलेल्या कपाटातून रोख १ लाख ७५ हजार व ४ तोळे सोन्याचे गंठन चोरट्यांनी उचका पाचक करून लांबविले.

घटनेनंतर लोणी पोलिसांना याबाबत स्थानिकांनी खबर दिली. त्यानंतर लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहणी करून चोरट्यांनी हाताळलेल्या वस्तू ताब्यात घेतल्या. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून ताब्यात घेतले आहे. 

सायंकाळी घटनास्थळी नगरहून श्वानपथक व ठसेतज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. श्वान घरापासून केवळ संकुलात रस्त्यावर घुटमळत राहिले. पाऊस झाल्याने हाती काहीच लागले नाही; मात्र चोरटे चोरीदरम्यान त्यांचा रुमाल तेथेच विसरले होते. याच ठिकाणी घुटका खाऊन थुंकले. फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनी कपाटावरील ठसे व रुमाल ताब्यात घेतला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.