टेलिकॉम आणि आयटी क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी विध्यार्थांना उपलब्ध.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बदलत्या काळानुसार टेलिकॉम आणि आय-टी नेटवर्किंग क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असल्याचे मत साई एंटरप्राईजेस चे संचालक निलेश गायकर यांनी विद्यार्थी वर्गासोबत बोलताना व्यक्त केले. समर्थ तंत्रनिकेतन कॉलेज बेल्हे येथील कॉम्पुटर क्षेत्रातील विध्यार्थी – विध्यार्थिनी यांनी संगमनेर शहरातील आय-टी आणि टेलिकॉम क्षेत्रात नावाजलेल्या साई एंटरप्राईजेस या टेलिकॉम आणि आय-टी कंपनी ला भेट देऊन नवीन प्रणाली समजून घेण्याचा प्रयत्न केला.


यावेळी विध्यार्थांना अनेक नवीन प्रणाली चा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन साई एंटरप्राईजेसचे संचालक निलेश गायकर, नेटवर्क इंजिनियर किरण आरोटे आणि कॉम्पुटर इंजिनियर प्रवीण काळे यांनी केले. याप्रसंगी अनेक विध्यार्थी – विध्यार्थिनी यांनी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला.

यावेळी मार्गदर्शन करताना निलेश गायकर म्हणाले , डिजिटल इंडिया सोबत बदलत असताना विध्यार्थाना प्रात्यक्षिक माहिती असणे आवश्यक असते.यापुढे ग्रामीण भागातील विध्यार्थाना नवीन अद्यावत प्रणालीचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल यासाठी विविध प्रकारची शिबीरे , मार्गदर्शन करणारी व्याख्याने आयोजित केले जातील , असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी प्रा.रामेश्वर वाव्हळ,प्रा.संदीप दळवी,प्रा.शिल्पा भागवत आदि प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे आभार इंजिनियर किरण आरोटे यांनी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.