राहुरीत कंटेनरखाली चिरडून युवक ठार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-मनमाड रस्त्यावर खरेदी-विक्री संघासमोर कंटेनरच्या चाकाखाली चिरडून १८ वर्षाच्या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना घडली.

राहुरी शहरातील नगर-मनमाड रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे दुचाकीवरुन जाणारा युवक ऋषीकेश विलास खैरनार हा नगरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर क्रमांक एचआर ५५ एम ७९९८ च्या चाकाखाली सापडल्याने ऋषीकेशच्या अंगावरुन कंटेनरची दोन्ही चाके गेल्याने रस्त्यावर युवकाच्या मेंदूचा चेंदामेंदा होवून त्याचा मृतदेह विखुरला गेला होता.

अपघात होताच अनेकांनी अपघातस्थळी धाव घेत युवकाचा मृतदेह रस्त्यावरुन बाजूला केला. ऋषीकेश हा आपल्या पोपळघट इस्टेट येथील घरुन सायंकाळी सहाच्या दरम्यान व्यायामासाठी त्यांच्या स्वत:च्या दुचाकी गाडीवरुन क्रमांक एमएच १७ - १९४६ वरुन जीमकडे निघाला होता. 

नगर-मनमाड रस्त्यावर खरेदी-विक्री संघासमोर निर्माण झालेल्या खड्यामुळे काळाने त्याच्यावर घाला घातला. रात्री उशीरा राहुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी ऋषीकेशला मयत घोषीत केल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.

मयत ऋषीकेश खैरनार हा डॉ.विलास खैरनार यांचा मुलगा होता. दरम्यान दोन वर्षापुर्वी डॉ.खैरनार यांचा मोठा मुलगा नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत नजीक च्या रस्ता अपघातात मयत झाला होता. तर आता दुसरा मुलगा ऋषीकेश हाही राहुरीत अपघातात मयत झाला आहे. 

ऋषिकेश हा राहुरी महाविद्यालयात प्रथम वर्ष शास्त्र शाखेत शिकत होता. डॉ.विलास खैरनार यांना दोनच मुले होती. दोन्ही मुलांना खैरनार कुटूंबियांना अपघातातच गमवावे लागल्याने परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.