पारनेर आयटीआय कॅम्पसमध्ये बिबटया आढळून आल्याने खळबळ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर शहरातील आयटीआय कॅम्पसमध्ये बुधवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबटया आढळून आल्याने पारनेर शहरात खळबळ उडाली आहे. भरवस्तीत बिबटया आढळल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 


बुधवारी संध्याकाळी पारनेर -अळकुटी रोडवरील आयटीआय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या संरक्षक भिंतीवर बिबटयाने दर्शन दिले. ही वार्ता शहरात पसरल्याने बिबटयाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. गर्दी होऊनही बिबटयाने आपली जागा सोडली नाही. 

दरम्यान, याबाबत माहिती मिळाल्यानंतर पारनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत कोकाटे, वनाधिकारी श्रीमती जगताप, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी पाहणी करून बिबटयाला पकडण्यासाठी पिंजरा लावला; परंतु बिबटया या सापळयात अडकला नाही. 

या परिसरात बिबटयाचा गेल्या चार ते पाच दिवसांपासून वावर आहे. याबाबत वनखात्याला कळवूनही वन खात्याने उपाययोजना केली नसल्याने वनखात्याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. बिबटयाला पकडण्यात यश न आल्याने आयटीआयमधील व टेक्निकल स्कूल च्या सुमारे तीनशे विद्याथांर्ना या कॅम्पसमध्ये धोका होऊ शकतो, त्यामुळे बिबटयाला लवकरात लवकर पकडण्याची मागणी होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.