भाजप सरकार शेतकरी हिताचे - माजी मंत्री बबनराव पाचपुते.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भाजप सरकार हे सर्वसामान्य शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे त्यामुळेच आता सर्वात मोठी कर्ज माफी झाली असून प्रत्येक्ष गरजू शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणूनच ऑनलाईन पद्धतीने कर्जमाफीची अर्ज भरून घेण्यात येत आहेत असे प्रतिपादन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा येथे माऊली कार्यालयात ऑनलाईन अर्ज भरण्याच्या शुभारंभी प्रसंगी बोलताना केले. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ नेते बाबासाहेब भोस होते तर प्रमुख म्हणून सभापती पुरुषोत्तम लगड , नगराध्यक्ष मनोहर पोटे,तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ दारकुंडे, सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर,लक्ष्मण नलगे ,मिलिंद दरेकर ,उपसभापती प्रतिभा झिटे ,तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक ,सुनीता शिंदे ,संदीप नागवडे ,वैभव पाचपुते आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाचपुते पुढे म्हणाले ,भाजप सरकार ने सर्वात मोठी कर्ज माफी जाहीर केली आहे या कर्जमाफीतून गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणूनच ऑनलाईन कर्ज माफी चे अर्ज भरण्यास सांगीतले आहे यातून शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे मागील कर्जमाफीत काही चुकीच्या पद्धतीने काम झाले म्हणून आता अश्या प्रकारे शासन माहिती गोळा करत आहे व प्रत्येक्ष संस्थेला फायदा न होता शेतकऱ्याला फायदा मिळणार आहे असे पाचपुते म्हणाले.

माऊली कार्यालयात ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे याठिकाणी मोफत अर्ज भरून देण्यात येणार आहेत तसेच याठिकाणी पक्ष पाहून अर्ज भरले जाणार नाहीत जो शेतकरी येईल त्याचे अर्ज भरले जाणार आहेत असे पाचपुते म्हणाले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.