भाजपमुळे सरकार नावाला विश्‍वास प्राप्त झाला – खा. विनय सहस्रबुद्धे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सरकार नावाचा विश्‍वास तीन वर्षात केंद्र सरकारने (भाजप) संपादन केला आहे. पारदर्शी व भ्रष्टाचार मुक्‍त सरकार अशी प्रतीमा निर्माण केली आहे.जगात देशाची प्रतीमा उंचावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याची 2022 मध्ये 75 वर्ष पूर्ण होत असताना भारताचे नाव जगात वरच्या स्थानी व ठळक देशात असेल, असा विश्‍वास भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्‍त केला.

दरम्यान, 27 ऑगस्टला एका मात्तब्बर कॉंग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे, याबाबत पत्रकारांच्या प्रश्‍नाला “नो कॉमेंट्‌स’ अशी प्रतिक्रिया देऊन मूळ प्रश्‍नाला खा.सहस्रबुद्धे यांनी बगल दिली व या नेत्याच्या पक्षप्रवेशावर एकेप्रकारे शिक्‍कामोर्तबच केले. सहस्रबुद्धे हे बुधवारी अकोले तालुक्‍याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी राजूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष वकील एम. एन. देशमुख, सचिव माजी प्राचार्य टी. एन. कानवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या बजेटला 30 टक्‍के कपात केंद्र सरकारने कात्री लावलेली आहे, याकडे लक्ष वेधले असता खासदार सहस्रबुद्धे म्हणाले की, केंद्राच्या बजेटला प्रशासनीक अडचणी येतात. इतिहासाच्या पुनर्लेखनाचा आक्षेप त्यांनी फेटाळला. विरोधक पुनर्लेखनाचा आरोप करुन आमचा अपप्रचार करीत आहेत. त्यात तथ्य नाही. पारंपरिक पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेण्यापेक्षा कौशल्याधिष्टीत शिक्षण रोजगार प्राप्तीला पूरक राहील. पदवीच्या आकर्षणापेक्षा व्यावसायिक कौशल्याचा जीवनामध्ये अर्थार्जनाला फायदा होईल.

गेल्या तीन वर्षात सरकारने जनतेच्या मनातील विश्‍वास संपादन केल्याचे सांगून ते म्हणाले, नात्यागोत्याचे धोरण दूर अंतरावर ठेवले आहे. हे सरकार काम करणारे आहे. भ्रष्टाचाराला मुठमाती देणारे हे सरकार जनतेच्या मनामध्ये खोलवर रुजले आहे. परराष्ट्र खाते, सार्वजनिक बांधकाम खाते व अन्य मंत्रलयाचे मंत्री काम करणारे असून पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील संकल्पनेला सिद्धी प्राप्त झाल्याने देशाबाहेरही आपली प्रतिमा उज्ज्वल बनली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.