मोबाईल कंपनीकडून ग्राहकाची आर्थिक लुट तक्रार कोणाकडे करायची मोठा प्रश्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आज मोबाईल हि अत्यावश्यक सेवा झालेली असताना मोबाईल कंपन्याकडून मोठ्या प्रमाणात ग्राहकाची लुट सुरु असून यामध्ये ग्राहकाने कोणाकडे तक्रार करायची असा प्रश्न निर्माण होतो आहे. मोबाईल कंपन्या ग्राहकाच्या माथी जास्तीत जास्त पैसे आकारून त्याची हि लुट करत असतानाच त्यासाठी दिली जाणारी सेवा हि मिळत नाही हे विशेष. मोबाईल कंपन्याची सर्वत्र सध्या जोरदार स्पर्धा सुरु आहे. जिओ कंपनीने आपले दर कमी करून सर्वच कंपन्याना आपले दर कमी करण्यास भाग पाडले आहे त्यामुळे ग्राहकाचा फायदा झाल्याचे दिसत आहे मात्र ग्रामीण भागात वाढलेल्या ग्राहकाची मात्र काही कंपन्या लुट करत असून त्याबाबत कोणाकडे तक्रार करायची असा मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे. 

कर्जत तालुक्यात एअरटेल कंपनीच्या पोस्टपेड ग्राहकांना सध्या अशा लुटीचा सामना करावा लागत आहे. राशीन येथील प्रशांत जाधव यांनी पोस्ट पेडचा ९९ रुपये मासिक प्लान घेतला यामध्ये ४०० मिनिट फ्री व फोर जी स्पीडचे २ जीबी डेटा मिळण्याचा वायदा संबधित एअरटेल कंपनीच्या स्थानिक अधिकृत विक्रेत्याने दिला होता त्यांप्रमाणे दोन तीन महिने बरोबर पैसे भरले गेले आता मात्र संबधित ग्राहकास बाराशे ते पंधराशे रुपये बिल कंपनीने पाठवले आहे याबाबत जाधव यांनी कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला असता प्रत्येक वेळी या ठिकाणी वेगळा व्यक्ती भेटतो व प्रत्येक वेळी वेगळे उत्तर दिले जातात. 

याशिवाय प्रथम एवढे रक्कम भरावीच लागेल असे सांगितले गेले जेव्हा जाधव यांनी याबाबत डिटेल देण्याचा आग्रह धरला असता ३४३ रुपये भरण्याचा सल्ला दिला त्याने ती रक्कम तिप्पट असताना भरली त्यांनी पुन्हा पुढच्या महिन्यात असेच वाढीव बिल आले असून यामुळे हे ग्राहक पूर्ण पणे वैतागले असून त्यांना आता आपण पूर्ण पैसे भरा अन्यथा आपली औउट गोईन्ग सुविधा पूर्ण बंद केली जाईल अशी धमकी फोन द्वारे दिली जात आहे. 

त्यामुळे एअरटेल कंपनी विरुद्ध त्यांनी आवाज उठविण्याचा निर्धार केला असताना याबाबतचा तक्रार अर्ज नेमका कोठे द्यायचा हा त्याचे पुढे प्रश्न पडला आहे. असाच अनुभव इतर अनेक ग्राहकांना येत असून कर्जत येथील आशिष बोरा यांना हि ठरलेल्या रक्कमेपेक्षा जास्त बिल कंपनीने लावले आहे. 

याबाबत त्यानी ट्राय कडे लेखी तक्रार केली आहे. कर्जत तालुक्यात ग्राहकाकडून फोर जी स्पीड देण्यासाठी पैसे आकारले जातात व प्रत्यक्षात थ्रीजी चा हि स्पीड येथे मिळत नाही अनेक वेळा तर येथे स्पीड शून्य दाखवला जातो. याबाबतही तक्रार कोणाकडे करायची हा मोठा प्रश्न असून याकडे कंपनीच्या अधिकृत व्यक्तीनी लक्ष देऊन ग्राहकाच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली जात आहे. कंपनीच्या अधिकृत व्यक्तीशी या बाबत संपर्क साधला असता ते पण थातूरमातुर उत्तरे देऊन वेळ काढू पणा करतात ज्या मुळे ग्राहक दोन तीन वेळा पाठपुरावा करतो व गप्प बसतो त्यामुळे अशा प्रश्नाकडे शासकीय यंत्रणानी लक्ष घालावे. 

अथवा खासदार दिलीप गांधी यांनी या प्रश्नी जबाबदारी निश्चित करून सर्व मोबाईल ग्राहकाना तक्रार करण्यासाठी यंत्रणा निर्माण करावी व त्या तक्रारीचा त्यानी पाठपुरावा करून नागरिकांना न्याय दयावा अशी मागणी केली जात आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.