विजय सांबरे यांना किर्लोस्कर वसुंधरा मित्र पर्यावरण पुस्कार प्रदान.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथील निसर्ग व पर्यावरण चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते विजय प्रल्हाद सांबरे यांना बुधवार ( ता. 23 ) रोजी नाशीक येथे झालेल्या भव्य समारंभात किर्लोस्कर वसुंधरा मित्र या पर्यावरण चळवळीतील मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. 


विजय सांबरे हे गेल्या वीस वर्षापासून लोकपंचायत संस्थेबरोबर संगमनेर व अकोले तालुक्यात काम करीत असून, पारंपरिक बियाणे संवर्धन, डांगी गाय संवर्धन आणि पुनर्रुजीवन यात त्यांनी सखोल काम केले आहे. उत्तर पश्चिम घाटांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या फार कमी व्यक्तींपैकी ते एक आहेत. संस्थेच्या माध्यमातून बचत गट व तरुण मित्र मंडळात नैसर्गिक साधन संपत्तीचा सुयोग्य व शाश्वत वापर करण्याचा प्रचार व त्याच्या कार्यप्रणालीवर मूलभूत कार्य सांबरे करीत आहेत.

देशभरात २० हून अधिक शहरांमध्ये भरणारा हा महोत्सव शोकेस या संस्थेच्या माध्यमातून नाशिकमध्ये सलग आठव्या वर्षी होत असून या वर्षीच्या महोत्सवाचा विषय'नदी वाचवा, जीवन वाचवा' असा असणार आहे. आपल्या संस्कृतीत नदीला जीवनदायी मातेची स्थान दिले गेले आहे.

 नदीकाठीच अनेक संस्कृती रुजल्या आणि वाढल्या. आजच्या आधुनिक काळात एकीकडे भौतिक विकास साधत असतांना नद्या मात्र दिवसेंदिवस आकसत चालल्या आहेत, अनेक ठिकाणी तर मरणासन्न अवस्थेत आहेत. काही ठिकाणी मात्र जागरूक शासन आणि नागरिकांच्या प्रयत्नातून नदीला पुनर्जन्म मिळाल्याची पण उदाहरणे आहेत. याच विषयावर जागृती करणायाच्या उद्देशाने हा महोत्सव भारतभर फिरत आहे.

 21 ते 24 ऑगस्ट दरम्यान किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नाशिक येथे होत आहे. यात बुधवार ता. 23 ऑगस्ट रोजी श्वास या ऑस्कर नामांकित चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या हस्ते व वेगुर्ला नगरपालिकेच मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास कोकरे, उपक्रमाचे प्रमुख विरेंद्र चित्राव यांच्या उपस्थितीत नाशिक मधील कुसुमाग्रज स्मारक येथे झालेल्या सेहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.