अभेद्य प्रतिष्ठाणने घेतलेले सामाजिक उपक्रम प्रेरणादायी - आ.संग्राम जगताप

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :युवकांनी एकत्र येवून सामाजिक कार्यासाठी स्थापन केलेल्या अभेद्य प्रतिष्ठाणच्या वार्षिक स्मरणिकेचे प्रकाशन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. 


यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगरसेवक संपत बारस्कर, संभाजी पवार, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मयुर विधाते, भैय्या विधाते, उबेद शेख, महादेव कराळे, राहुल गाडळकर, पवन धूत, सनी विधाते, अतुल कावळे, दर्शन विधाते, आदित्य कोली, ऋषीकेश शेलार, विजय कोहक, योगेश फुंदे, वैभव शिंदे, श्रीकांत कचरे, ओम पांडे, ऋषीकेश कराळे आदिंसह प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याच्या उद्देशाने युवकांनी स्थापन केलेल्या अभेद्य प्रतिष्ठाणच्या वतीने वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचा आढावा या स्मरणिकेत छायाचित्रासह मांडण्यात आला असल्याचे प्रास्ताविकात मयुर विधाते यांनी सांगितले.

संग्राम जगताप म्हणाले की, युवकांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेतल्यास बदल निश्‍चित घडणार आहे. युवकांच्या माध्यमातूनच नगरची विकासात्मक दिशेने वाटचाल चालू आहे. अभेद्य प्रतिष्ठाणने घेतलेले सामाजिक उपक्रम प्रशंसनीय व प्रेरणादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त करुन, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अभेद्य प्रतिष्ठाणच्या वतीने शुक्रवार दि.25 ऑगस्ट रोजी सारसनगर येथून श्री गणेशाच्या प्रतिष्ठापणेसाठी पारंपारिक ढोल पथकासह मिरवणुक काढून सामाजिक संदेश दिला जाणार आहे. तर गणेशोत्स्वानिमित्त सारसनगर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.