रुग्णालयांच्या अतिक्रमणांवर घाव सुरूच राहणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शहरातील अतिक्रमण केलेल्या रुग्णालयांवर कारवाई सुरूच राहणार आहे. महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी दाखल केलेली याचिकेवरील सुनावणीस नकार दिला. मूळ जनहित याचिकेत ही याचिका विलीन करून त्यावर सात सप्टेंबरला एकत्रित सुनावणी होणार आहे. 
महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमणांवरील कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. प्रकाश गरूड, डॉ. शंकर शेळके, डॉ. बडे यांनी औरंगाबद खंडपीठात वैयक्तिक याचिका दाखल केली होती. ॲड. विनायक दीक्षित यांनी डॉक्टरांच्यावतीने न्यायालयासमोर बाजू मांडली. 

मूळ याचिकाकर्ते शाकीर शेख यांनी यावर हस्तक्षेप अर्ज सादर केला होता. ॲड. मुकुल कुलकर्णी यांनी शेख यांच्यातर्फे बाजू मांडली. खंडपीठाने डॉक्टरांची बाजू ऐकूण घेतल्यानंतर त्यांच्या याचिक मूळ जनहित याचिकेत एकत्र करून त्यावर सात सप्टेंबरला सुनावणी ठेवली. पण, सध्या सुरू असलेल्या कार्यवाहीला स्थगिती देण्यास नकार दर्शविला.

सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी नगर शहरातील रुग्णालयांच्या अतिक्रमणांबाबत जनहित याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेला कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. महापालिकेने महिनाभर शहरातील अतिक्रमण धारक रुग्णालायंवर कारवाईचा बडगा उचलला आहे. यातून डॉक्टर व महापालिका प्रशासनान समोरासमोर आले आहे.

दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार महापालिकेला अतिक्रमण केलेल्या १२१ रुग्णालयांवर चार आठवड्यात कारवाई करणे अपेक्षीत आहे. पण आतापर्यंत २० रुग्णालयांवरच कारवाई झाली आहे. कारवाईची गती पाहिल्यास ती खूपच सावकाश आहे. 

या चार आठवड्याच्या आत कारवाई पूर्ण न झाल्यास महापालिकेविरोधात आपण न्यायालयाचा अवमान केल्याची तक्रार करणार असल्याचे कामगार युनियनचे अनंत लोखंडे यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.