डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वप्न सत्यात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :डॉ. तनपुरे कारखाना सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रवरा व गणेश कारखान्याच्या कामगारांची मदत घेऊन तनपुरे कारखाना सुरू करण्यासाठी मशिनरी दुरूस्ती केली जात आहे. डॉ.सुजय विखे यांनी कारखाना दुरूस्तीची पाहणी करून तनपुरे कारखान्याच्या ३०० कामगारांना प्रत्येकी १० हजार रुपये अग्रिम वेतन अदा करण्याचा निर्णय घेतला. यामुळे कामगारांमध्ये उत्साह संचारला आहे. 

तनपुरे कारखाना गेल्या ३ ते ४ वर्षांपासून बंद असल्याने कामगारांचे सर्वाधिक हाल झाले. पूर्वीच ४५ महिन्यांचे वेतन थकलेले असताना बंद पडलेल्या कारखान्याचा बोजा कामगारांवर निर्माण झाला. बेरोजगार झालेल्या कामगारांचे कुटूंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहे. दरम्यान निवडणुकीत एकहाती कारखान्याची सत्ता स्थापन करून तनपुरे कारखाना सुरू करण्याचे व्रत हाती घेतलेले डॉ. सुजय विखे यांचे स्वप्न सत्यात उतरत असल्याचे दिसू लागले आहे.

जिल्हा बँकेकडून थकीत कर्जाचे पुनर्गठण केल्यानंतर कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात आला. तेव्हापासून डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वात संचालक मंडळ कारखाना सुरू करण्यासाठी धडपड करीत असल्याचे दिसत आहे. तनपुरे कारखान्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली मशिनरी लवकर सुधारावी म्हणून तनपुरे कारखान्याच्या ३०० कामगारांना प्रवरा व गणेश कारखान्याचे कुशल कर्मचारी व अधिकारी डॉ. सुजय विखे यांनी उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे तनपुरे कारखान्याच्या कामगारांना मोलाचे सहकार्य लाभत असून मशिन दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती कारखाना प्रशासनाकडून मिळाली आहे. 

डॉ. सुजय विखे यांनी नुकतेच कारखाना मशिनरी दुरूस्तीची पाहणी करून तनपुरे कारखान्याच्या कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. कामगारांनी आर्थिक परिस्थिती मांडताच विखे यांनी तनपुरे कारखान्याच्या ३०० कामगारांना प्रत्येकी १० हजार रुपये अग्रिम वेतन अदा करण्याचा निर्णय घेतला. अनेक वषार्नंतर कारखाना सुरू होऊन आपले प्रपंच पुन्हा सुरळीत होतील या आशेपोटी तनपुरे कारखान्याचे कामगार मशिनरी दुरूस्तीसह इतर कामकाजासाठी सरसावले असून संचालक मंडळाला डॉ. सुजय विखे यांच्याकडून मिळणारी मोलाची मदत पाहता कारखाना सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

यंदा कामगारांच्या वतीने गणरायाचा उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी कामगारांची जयत तयारी सुरू झाल्याचे समजत आहे. तसेच कारखाण्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, व्हाईस चेअरमन शामराव निमसे आदिंसह संचालक मंडळ डॉ.सुजय विखे यांच्या मार्गदर्शखाली कारखाना लवकरात लवकर सुरु व्हावा यासाठी प्रयत्नात असुन कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.एन.सरोदे हे नित्याने कारखान्याच्या दुरुस्तीच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवुन आहेत .

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.