नियोजन समितीच्या निवडणुकीत भाजपाची मुसंडी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकी ची मतमोजणी प्रक्रिया बुधवारी सुरळीत पार पडली. दुपारी जाहीर झालेल्या निकालात भाजपाने ९ जागांवर विजय मिळविला तर काँग्रेस- राष्ट्रवादीला प्रत्येकी ११ जागा मिळाल्या आहेत तर ५ जागांवर इतर पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत.


या निवडणुकीत सेनेला १ जगावर समाधान मानावे लागले सेनेची पीछेहाट झाली आहे नाही सेनेचे नेते अनिल कराळे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले . जिल्हा नियोजन समितीच्या ३६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया मंगळवारी झाल्यानंतर बुधवारी सकाळी सैनिक लॉन येथे निवडणूक अधिकारी पालवे ,आनंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३५ कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडली .

योग्य नियोजनामुळे निकाल दुपारीच जाहीर करण्यात आला यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता , या निवडणुकीत भाजपचे ९ , काँग्रेस ११ , राष्ट्रवादी ११ , क्रातींकारी पक्ष २, सेना १ तर जनशक्ती १ , आणि महाआघाडीचा १ उमेदवार विजयी झाला आहे . या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवत मुसंडी मारली आहे .

निवडणुकीतील विजयी उमेदवार असे - जिल्हा परिषद महिला सर्वसाधारण प्रवर्गातील ९ जागांसाठी १० उमेदवार होते, यापैकी राजश्री घुले राष्ट्रवादी , आशा दिघे काँग्रेस , अनुराधा नागवडे कॉ. रोहानी निघुते कॉ , सुप्रिया पाटील राष्ट्रवादी , सुनीता भांगरे भाजप ,राणी लंके सेना ,दीपाली गिरमकर भाजप ,आणि विमल आगवणे राष्ट्रवादी , याचा समावेश आहे . जिल्हा परिषद सर्वसाधारण गटासाठी ८ जागा निर्धारित होत्या , विजयी उमेदवारात राजेश परजणे काँग्रेस , जाळीदार वाघचरे बीजेपी , प्रभावती ढाकणे राष्ट्रवादी , आणि हर्षदा काकडे व सुधाकर दंडवते जनशक्ती याचा समावेश आहे. 

तर पराभूत उमेदवारांमध्ये पुष्प वराळ ,शरद झोडगे सेना व गुलाबराव तनपुरे याचा समावेश आहे . जिल्हा परिषदेच्या नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी ५ जागेसाठी ६ उमेदवार रीगणात होते विजयी उमेदवारात रामहरी कातोरे , सुनील गडाख , शिवाजी गाडे , दत्तात्रय काळे , व प्रताप शेळके याचा समावेश आहे तर सेनेचे नेते अनिल कराळे हे पराभूत झाले आहे .नगरपंचायत मतदार संघातील खुल्या गटात १ जागा महिलेसाठी आरक्षित असणाऱ्या जागेवर सोनाली नायकवडी या विजयी झाल्या आहेत . 

नगरपालिकासर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित असणाऱ्या जागेवर डॉक्टर उषाताई तनपुरे राष्ट्रवादी ,या विजयी झाल्या तर नगरपालिका अनुसूचित जातीसाठी आरक्षित जागेवर संतोष कांबळे , हे महाआघाडीचे उमेदवार विजयी झाले असून त्यांनी चंद्रकला डोळस याचा पराभव केला .नगरपालिकेतील नागरिकाचा मागास प्रवर्ग या जागेसाठी स्नेहल खोरे या महाआघाडीच्या उमेदवार विजयी झाल्या असून त्यांनी डॉक्टर मंगला गाडेकर याना पराभूत केले आहे . मतदानाच्यावेळी १० मतदारांनी मतदान करणे टाळले होते यात पागरमल दारूकांड प्रकरणातील आरोपी भाग्यश्री मोकाटे याचा समावेश होता.

या निवडणुकीत क्रॉस वोटींग झाले याचा फायदा भाजप व दोन्ही काँग्रेसला झाला . यानिवडणुकीत सेना बाजूला पडली आहे नामदार शिंदे यांनी एका दिवसात प्रचारात आघाडी घेऊन चांगला विजय मिळवला . सुरवातीला काँग्रेस ,राष्ट्रवादी व शिवसेना अशा त्रिपक्षीय महाआघाडीची मोट बांधण्यात आली होती मात्र अचानक शिवसेनेला बाजूला करण्यात येऊन काँग्रेस - राष्ट्रवादीने क्रातींकारीला सोबत घेतले त्याचा तिघांनाही फायदा झाला यात सेना बाजूला फेकली गेली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.