श्रीरामपुरात दरोडेखोरांच्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी, पावणे दोन लाखांची लूट.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर तालुक्यातील लाडगाव येथे आज पहाटे दरोडा टाकून सहा तोळे सोन्यासह, रोकड व मोबाइल असा सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत पती-पत्नी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, श्­वानपथकाने दाखविलेल्या मागामुळे चौघा संशयितांना पोेलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

संशयितांमध्ये विनोद दिलीप पवार, मुकेश दिलीप पवार, मंगेश बाळू काळे व संजय तात्या काळे (सर्व रा. सोमय्या फार्म शिवार, लाख, ता. राहुरी) यांचा सामावेश असून चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच अन्य दोन मुलांनी चौकशी करून सोडण्यात आले. दरोड्याच्या तपासाकामी पोलीस निरीक्षक वसंत पथवे व पथकाने कसोसशीने प्रयत्न केल्याने दरोड्याचा तपास लावण्यात यश आले. नगर येथून बोेलाविलेल्या श्­वानपथकामुळे अवघ्या चार तासांत पोलिसांना दरोडेखोरांपर्यंत पोहचता आले. .

लाडगाव शिवारात रेल्वेच्या भुयारी पुलाजवळ असलेल्या गडाख वस्तीवर आज पहाटे पाच दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. विश्­वनाथ पुंजा गडाख (वय ६९) यांच्या वस्तीवर येत घराचा दरवाजा उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर घरात उचकापाचक सुरु केली. तसेच गडाख यांना मारहाण केली. त्यास विरोध केल्याने त्यांना आणखी मारहाण करण्यात आली. त्यांना वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या त्यांच्या पत्नी सिंधु (वय ६०) यांनाही मारहाण केली. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी दरोडेखोरांनी सहा तोळे सोन्याचे दागिने, तीन हजार रुपये रोख व एक मोबाईल चोरुन नेला. जखमी दोन्ही पती-पत्नीवर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.