शेवगाव - बंधा-याच्या पाण्यात पडून युवकाचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पोळ्याच्या सणानिमीत्त शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथे गावी आलेल्या शुभम दशरथ बोडखे ( वय- 22 ) या युवकाचा बंधा-यातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून पाण्यात पडल्याने मृत्यू झाला. सोमवारी (दि. 21 ) सकाळी साडेअकराच्या दरम्यान ही घटना घडली. मयत शुभमच्या निधनाने शेतक-यांनी पोळा सण केला नाही. 


मयत शुभम याच्या मागे आई- वडील , आजी -आजोबा व दोन लहान बहिणी असा परिवार आहे. तो नगर येथे बी. टेक. - अॅग्रीचे तिस-या वर्षाचे शिक्षण घेत होता. अभ्यासात हुशार असलेला शुभम हा मनमिळावू स्वभावाचा होता.
मयत शुभम हा पोळ्याच्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास शेतात व देवाला नारळ फोडण्यासाठी गेला होता.

बंधा-यातील पाण्यातून तांब्याभर पाणी घेताना पाण्याचा अंदाज न आल्याने घसरून तो पाण्यात पडला. दुर्दैवाने त्याला पोहता येत नसल्याने व चिखलात अडकल्याने नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. तो लवकर घरी आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी शोधाशोध सुरू केली. 

बंधा-या जवळ पाय घसरलेल्या खुणांवरून तो पाण्यात पडला की काय अशी शंका आल्यावर बंधा-याच्या फळ्या काढण्यात आल्या. पाणी कमी झाल्यावर मयत शुभम याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर सोमवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात त्याच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.