माजीमंत्री बबनराव पाचपुते 'सराईत' गुंड !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार बबनराव पाचपुते व त्यांच्या भावाने गेली अनेक वर्षे सत्तेच्या माध्यमातून पोलिसांना हाताशी धरून तालुक्‍यातील सर्वसामान्यांना छळले. तालुक्‍यातील अनेकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवल्याचा आरोप करत माजी मंत्री बबनराव पाचपुते हे सराईत गुंड असल्याचा थेट आरोप कुकडीचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत केला.जगताप पुढे म्हणाले, पाचपुते हे आ. जगताप यांच्यामुळे तालुक्‍यातील प्रश्‍न जटिल झाल्याची पत्रकबाजी करून बदनामी करण्याचे पाप करीत आहेत. आ. राहुल हा नशीबवान माणूस आहे. आ. राहुलवर टीका करणाऱ्यांनी स्वतःच्या मुला-पुतण्यांचे काम बघावे, असा सल्लाही जगताप यांनी दिला. 

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला पूर्वनियोजित होता. या प्रकरणात पाचपुते यांनी पोलिसांना हाताशी धरून गुन्ह्यातील नावे वाढवली. पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणीदेखील कुंडलिकराव जगताप यांनी यावेळी केली.

तालुक्‍यातील पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करताना जगताप यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, तालुक्‍यात घडणाऱ्या खून-दरोड्यासारख्या निम्म्या घटना या पोलिसांच्या सहकार्यानेच घडतात.

आमदार राहुल जगताप हे बालिश असल्याची टीका करणाऱ्या पाचपुते यांनी आ. जगताप यांची एखादी चूक दाखवून द्यावी. पाचपुते यांनी गेली 30 वर्षांत तालुक्‍यातील जनतेला विमानतळ, औद्योगिक वसाहत अशी कित्येक स्वप्ने दाखवली, घोड-विसापूरची उंची वाढविण्याची घोषणा केली. तालुक्‍यात केवळ आश्‍वासनांचा पाऊस पाडला, हा पाचपुतेंचा पोरकटपणा नाही का?” असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.