श्रीगोंद्यात कोणाचे गुंडाराज आहे हे जनतेला माहिती आहे - माजीमंत्री पाचपुते.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आम्ही जर राजकारणाच्या माध्यमातून गुंडगिरी केली असती तर तालुक्यात गुंडाराज झाले असते पण आपण राजकारणाच्या माध्यमातून नेहमीच विकासात्मक विचार ठेवून राजकारण व समाजकारण केले आहे तालुक्यात कोण गुंड आहे हे जनता चांगल्या प्रकारे ओळखून आहे अश्या शब्दात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी कुकडीचे संस्थापक कुंडलिक जगताप यांच्या टीकेला उत्तर दिले . 


आमच्या ३५ वर्षाच्या राजकारणात आम्ही गद्दारांना नेहमीच मदत केली हेच आमचे राजकारणातील चुकीचे पाऊल पडले आहे आमच्या जीवावर विविध पदे भोगणाऱ्यांना गद्दारांना आता आम्ही गुंड दिसू लागलो काय असा सवाल हि पाचपुते यांनी उपस्थित केला .
कुकडीचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांनी काल पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर टीका करताना सराईत गुंड असा उल्लेख केला होता त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना माजी मंत्री पाचपुते म्हणाले श्रीगोंदा तालुक्यात गेली अनेक वर्ष राजकारण करताना आम्ही कधी चुकीचे वागलो नाही जर वागलो असतो तर जनतेने आम्हाला नेता म्हणून स्वीकारलेच नसते.

आम्ही राजकारण करताना नेहमीच विकासात्मक दृष्टीकोण ठेवून कामे केली आहेत कोणाचे संसार मोडण्याचे उद्योग केले नाहीत कोणामुळे लोकांचे संसार उघड्यावर पडले भावाभावात भांडणे लागली हे तालुक्यातील जनता ओळखून आहे . जर आम्ही पोलीस यंत्रणेचा वापर केला असता तर गत विधानसभा निवडणुकीत तुम्हाला लोकांनी पैसे वाटप करताना पकडले होते तरी सुद्धा आम्ही शांत राहिलो जर वापर केला असता तर तुमचा मुलगा आमदार दिसला नसता यांचे भान ठेवा.

आम्ही फक्त वयाचे भान ठेवतो म्हणून गप्प आहोत याचा अर्थ असा नाही कि आम्हाला काहीच बोलता येत नाही जर आम्ही तुमच्याविषयी बोललो तर तुमची पळता भुई थोडी होईल याचे भान ठेवा असा इशाराही जगताप याना दिला आहे.

विसापूर चा कुकडी मध्ये समावेश झाला याचेच खरे दुःख तुम्हाला झाले आहे तुमच्या पुत्राने विसापूर साठी काय प्रयत्न केले,माळढोक क्षेत्र कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले विजेच्या प्रश्नावर काय केले स्वतःच्या गावातील वीज केंद्र आमच्या प्रयत्नामुळे झाले आहे हेही जनतेला सांगावे,कॅनॉल मध्ये दुरुस्थीसाठी शासनाने पोकलेन मशीन दिल्या आहेत पण याचेही श्रेय स्वतः घेत आहेत निधी शासनाचा पण बिले कोण काढत आहे हे एकदा सांगावे , 

फक्त आडकाठी आणण्याचे धोरण सध्या तुमच्या पुत्राने अवलंबविले आहे तुमचा पुत्र खरच नशीबवान आहे त्यांच्यामुळेच तालुक्यातील शेतकऱ्यांचे वाटोळे झाले तरी सुद्धा तुमच्या दृष्टीने ते नशीबवान आहेत हि खेदाची बाब आहे फक्त स्वतःच्या पुत्राचे अपयश झाकण्यासाठी अंथरुणाला भिडले असताना देखील तुम्हाला मुलाची बाजू सावरण्यासाठी पुढे यावे लागत आहे हि अतिशय लाजिरवाणी बाब आहे असे पाचपुते म्हणाले .

आम्ही फक्त वयाचे भान ठेवतो 
आम्ही फक्त तुमच्या वयाचे भान ठेवतो त्यामुळे आम्ही तुमच्यावर काही बोलत नाही याचा चुकीचा अर्थ लावून आमच्यावर चुकीचे आरोप करून स्वतःच्या मुलाचे अपयश झाकण्यासाठी जनतेची दिशाभूल करणे थांबवा अन्यथा आम्हाला मागील इतिहास काढावा लागेल असा इशारा पाचपुते यांनी जगताप यांना दिला ,जिल्हा बँकेला दोन वेळा कोणी मदत केली ,ज्यावेळी घोड जळत होते त्यावेळी तुम्ही हसत होतात आम्ही कधीच घोड कुकडी वाद लावला नाही आम्ही अनेकवेळा विचारलेल्या प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न करीत आहेत कुकडीत काटा मारता याचे उत्तर कोण पद्धतीने आरोप करण्याची त्यांची जुनीच पद्धत आहे असे पाचपुते म्हणाले

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.