नदीपात्रात वाळूमाफीयांचा दरोडा लिलावच नाही मग वाळू उपसा कसा?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालूक्यातील दिघोळ ,धनेगाव नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून अनेक जणांनी हजारो ब्रास वाळूचे साठे केले असल्याचे पहावयास मिळत आहे.दररोज हजारो ब्रास वाळूची अवैधरीत्या दिवसाढवळ्या वाहतूक होत आहे प्रशासनाचा आंधळ्या कारभारामुळे वाळू तस्कर चांगलेच फुलत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. महसूल व पोलीस प्रशासनाचे अर्थपुर्ण दूर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे. विनापरवाना नदी पात्रातून वाळूची उपसा मोठ्या प्रमणात होत असल्याचे चित्र तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.
त्याचप्रमाणे जामखेड तालुक्यातील वंजारवाडी ( धानोरा ) येथील महाराष्ट्र शासनाच्या गट नं 41 मधून गेल्या सहा महिन्यांपासून रात्रंदिवस दररोज अनाधिकृतपणे वाळू उपसा होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून लिलावच झालेला नाही संबधित ग्रामपंचायत प्रशासन अर्थाअर्थी डोळेझाक करत आहे येथून पिंपरखेड, फक्रारबाद, आरणगाव, डोणगाव, पारेवाडी, कवडगाव, भवरवाडी आदी ठिकाणी वाळू जात आहे.

हा प्रकार राजरोसपणे सुरू असताना महसूल विभागाचे अधिकारी व तलाठी यांच्या कडून कोणी तक्रार केल्यानंतर सदर वाहनाचा व वाळूचा पंचनामा केला जातो व नंतर तहसील कार्यलयातील काही कर्मचारी हे आर्थिक तडजोडीने मिटवलि जाते. त्यामुळे महसूल प्रशासन त्यांच्यावर कारवाई करण्यास धजावत नाही सध्या तालुक्याला तहसीलदार नसल्याने गौणखनिजाच्या अवैध धंद्याला उत आला आहे त्यामुळे दिवसरात्र होत असलेल्या या वाळू उपसामुळे नदीतील वाळूची पातळी खालावली आहे. 

याचा फटका नदीचा काठावर असलेल्या शेतकऱ्यांना बसत आहे. सततचा वाळू उत्खननामुळे दिवसेंदिवस या नदी पात्राचा कडेला असलेल्या असंख्य शेतकऱ्यांचा जमिनी हळूहळू नदीत सामावल्या जात आहेत. याशिवाय शेतकऱ्यांचा जमिनीला लागून असलेल्या वाळू लिलाव झाला नसला तरी वाळू माफिया स्थानिक प्रशासनाला ना जुमानता या ठिकाणाहून वाळूची तस्करी करत आहेत.

वाळू माफिया राजरोसपणे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करत आहेत. त्यामुळे शासनाचा महसूलासोबतच शेतकऱ्यांदेखील त्याचा फटका बसत आहे. शिवाय दिवसरात्र गावातून होणाऱ्या या अवैध वाळू माफियांवर कुणाचे नियंत्रण नसल्यामुळे गावातील रस्त्याचीदेखील दुरावस्था झाली आहे.

वाळू उपसा करणारे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आघाडीवर आहेत यांचेच वाळूसाठे करणारात समावेश आहे पोलीस व महसूल प्रशासनाला याबाबत माहिती असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे त्यातच प्रभारी तहसीलदार कारवाई करण्याकडे कानाडोळा करत आहे शासनाला लाखो रूपयांचा चूना लावणाऱ्या वाळूमाफीयांवर कारवाई होणे काळाची गरज आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.