श्रीगोंदा तालुक्यातील पानवलकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील निमगावखलू येथील अक्षय राजू पानवलकर याचा त्याच्याच मित्रांनी २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून त्याचा खून केला होता.या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अपहरण, खंडणी व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी मयत अक्षयचे मित्र असलेल्या आरोपी मित्रांसह पाचजणांना अटक केली होती.त्यापैकी दोन आरोपी अल्पवयीन होते, ते सध्या जामिनावर बाहेर आहेत.तर उर्वरित तीन आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 

परंतु या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन भरत चव्हाण (वय २५,रा.गणेशा,गवतेमळा,रेल्वेस्टेशन शेजारी रा.काष्टी ता.श्रीगोंदा) हा मात्र फरार होता. सचिन याने त्याच्या मित्रांच्या मदतीने हा खून केलेला होता. पोलीस त्याचा अनेक दिवसांपासून शोध घेत होते. 

आज आरोपी सचिन हा कर्जत तालुक्यात सिद्धटेक येथे त्याचा आजोबांच्या दशक्रिया विधीसाठी येणार असल्याची गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून व मोबाईल टॉवरच्या लोकेशनवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना मिळाली होती.

त्यानुसार आज रविवार (दि २०) रोजी सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास निरीक्षक पोवार यांनी त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी प्रकाश वाघ, दादा टाके,देवकाते यांच्यासह साध्या वेशात सिद्धटेक येथे सापळा लावून, आरोपी सचिन भरत चव्हाण याला पोलिसांनी अटक केली. त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.