संगमनेर-कोपरगाव रस्त्यावर भाजीपाल्याचा ट्रक उलटला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावानजीक आरामपूर खळवाडीनजीकच्या वळणावर भाजीपाला भरलेला मालवाहू ट्रक उलटला. संगमनेर- कोपरगाव रस्त्यावर मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली. या अपघातातून चालक व क्लिनर बालंबाल बचावले. कोणतीही जीवितहानी झाली नाही.

संगमनेर-कोपरगाव रस्त्याने संगमनेर येथून फ्लॉवर घेवून निघालेला मालवाहू ट्रक (क्र. युपी ८० बीटी ३०८१) हा कोपरगावच्या दिशेने भरधाव वेगाने चालला होता. तळेगाव दिघे नजीकच्या वळणावर सदर मालवाहू ट्रक आला असता चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घरानजीकच्या साईड गटारात तो उलटला.

चालक प्रविण ठाकूर व क्लिनर राजबीरसिंग रतनसिंग (रा. समराबाद, आग्रा) हे दोघे अपघातातून बालंबाल बचावले. मालवाहू ट्रक संगमनेर येथून आग्रा येथे भाजीपाला घेवून चालला होता, असे सांगण्यात आले. अपघात झालेल्या घरानजीक मोठा खड्डा असल्याने खड्ड्यातच ट्रक अडकला. सुदैवाने जवळपास कुणी नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातप्रसंगी भानुदास दिघे व नामदेव सीताराम दिघे यांनी मदतकार्य केले.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.