स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलिसांनी वाचवले शेतकऱ्याचे प्राण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दोन दिवसा पासून पडत असलेल्या पावसा मुळे नदी - नाले तुडुंब भरून वाहत असून त्या मुळे नागरिकांना पावसाच्या पाण्याचा अंदाज येत नाही, नगर मधील निंबळक गावच्या जवळ असणारी नदीला पूर आला असतानाही पाण्याचा अंदाज न घेता  पाण्यात पिकअप गाडी घेऊन गेलेले बाबासाहेब बबन मेमाने हे गाडी बंद पडल्याने गाडी सह अडकून पडले होते.


या बाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी आपल्या कर्मचार्यांसह धाव घेऊन परिस्तिथीचा अंदाज घेऊन स्वतः पाण्यात उतरून ग्रामस्थ आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने पीक अप व्हॅन मधील मेमाणे याना सुखरूप बाहेर काढले.

सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण
सुमारे अर्धातास हे ऑपरेशन राबवून मेमाणे यांची सुखरूप सुटका करण्यात आली साध्य पाऊस पडत असून पाण्याचा अंदाज येत नसल्याने माहिती नसलेल्या ठिकाणी पाण्यात वाहने घालू नये स्वतःची काळजी घ्यावी असे आव्हान सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.