श्रीगोंद्यात चोरट्यांचा धुमाकुळ,अडीच लाखाचा ऐवज चोरीस.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगावपिसा व कोळगाव येथे घरफोडीची घटना घडली असून, अडीच लाखाच ऐवज चोरीस गेला आहे.यात पिंपळगावपिसा येथील कदमवस्तीवरील चंद्रकांत आप्पासाहेब पंधरकर व त्यांच्या पत्नी, व दोन लहान मुलींनाही चोरांनी काठीने मारहाण करूण ६० हजार रंपयांचा ऐवज पळवला आहे. तर कोळगाव येथील सुदर्शन शंकर घालमे यांच्या घरून १ लाख ९७,००० हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या दोन्ही घटनांबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात घरफोडी व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील पिंपळगावपिसा येथे कदम वस्तीवरील चंद्रकांत आप्पासाहेब पंधरकर व त्यांचे बंधू सतीश हे काल दि.१८ रोजी रात्री पंधरकर कुटुंबीय रात्री झोपले असता. मध्यरात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास तोंडाला काळे फडके बांधून आलेल्या अज्ञात चार चोरांनी दरवाजावर दगड टाकून दरवाजा उघडून घरात प्रवेश केला.

चंद्रकांत यांना मारहाण केली, यावर त्यांनी तुम्हाला काय न्यायचे ते न्या पण मारू नका, असे सांगितले.मात्र चोरांनी त्यांच्या पत्नीला देखील मारहाण केली. तसेच त्यांच्या चार ते पाच वर्षे वयाच्या पुतणी गौरी हिच्या डाव्या हातावर तर कोमल हिच्या बरगडीवर काठीने जोरात मारहाण केली. त्यामुळे त्या दोघी जखमी झाल्या. 

चोरांनी सामानाची उचकापाचक करून, मुली व महिलांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने ओढून घेत जवळपास ६०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. जाताना पंधरकर यांच्या मोबाईलमधील सीमकार्ड काढून देत मोबाईल सोबत घेऊन चोरटे पसार झाले. तसेच आरडाओरडा केल्यास पुन्हा मारू असा दम दिला. त्यानंतर बाजूला राहणाऱ्या नितीन शिंदे व सुभाष कदम यांनी या जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दुसऱ्या घटनेत सुदर्शन शंकर घालमे यांच्या घराची मध्यरात्री चोरांनी कशाने तरी घराची कडी उघडून त्यांच्या घरातील कपाटातून १ लाख ९७,००० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या दोन्ही घटना एकाच रात्री घडल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. याघटनेबाबत पुढील तपास बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परमवीर पांडुळे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.