जुगार अड्डयावर छापा,नगरसेवक सुनील कोतकरसह आठ जण ताब्यात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेलमधील बंद खोलीत सुरू असलेल्या जुगारावर छापा घालत पोलिसांनी नगरसेवकासह नऊ जणांना ताब्यात घेतले. या छाप्यात पोलिसांनी मोबाईल, रोख रक्कम असा एकूण तीन लाख सहा हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 


पोलीस कर्मचारी सुमीत गवळी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. नगरसेवक सुनील सर्जेराव कोतकर, मच्छिंद्र शेवाळे, बाजीराव येवले, मधुकर मोहिते, राजेंद्र ससे, बाळासाहेब गारुडकर, संतोष चितळे, दत्तात्रय गिरमे, वैभव भोगाडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शुक्रवारी (दि.१९) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन येथील हॉटेल यश ग्रॅण्ड येथे एका बंद खोलीत जुगार खेळला जात होता. कोतवाली पोलिसांनी याची माहिती मिळाली.

पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षकडॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून या जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली. 

पोलिसांचा छापा पडल्याने जुगार खेळत असल्यांची भंबेरी उडाली. काहींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने काहींनी तोंड देखील लपवली. या छाप्यात ३ लाख रुपयापेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.