ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आतापासूनच पूर्वतयारी करा, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी अभय महाजन यांना दिले आहेत. आगामी महिन्यात जिल्हाभरातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे.


राज्यभरातील तब्बल 8 हजार 439 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील 273 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. गेल्या महिन्यात या ग्रामपंचायतींची प्रभागरचना व आरक्षणाची अंतिम यादी ग्रामपंचायतनिहाय प्रसिद्धदेखील केली आहे. ऑक्‍टोबर महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. 

हा कार्यक्रम संपल्यानंतर सप्टेंबर महिन्यात या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. यामध्ये राहुरी तालुक्‍यातील हंडीनिमगाव, पळशी, पारनेर तालुक्‍यातील पुणेवाडी, कोरडगाव, पाथर्डी तालुक्‍यातील जिरेवाडी, सोनोली व कोपरगाव तालुक्‍यातील भोजडे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 14 ऑगस्ट रोजी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची पूर्वतयारी करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. या निवडणुकीचे पर्यवेक्षण नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मात्र विभागीय आयुक्‍त यांच्यावर सोपविली आहे.

या निवडणुका भयमुक्‍त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांवर असणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी जी काळजी व दक्षता घेतली जाते तीच दक्षता व काळजी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत घेण्यात यावी, असे निर्देश आयोगाने दिले आहेत. 

या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रे निश्‍चित करा, संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्रांची यादी तयार करून योग्य ती उपाययोजना करा. मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून या केंद्रावर शौचालय, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, रॅम्प, सुरक्षा भिंत, आदी सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. 

निवडणुकीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्यास विभागीय आयुक्‍त यांच्याशी चर्चा करून अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून घेण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. निवडणुकीसाठी आवश्‍यक असणाऱ्या सर्व बाबींची आतापासूनच पूर्वतयारी करण्याचे निर्देश आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.