प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून द्या निळवंडे ग्रामस्थांची ना.विखेंकडे मागणी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :निळवंडे धरण प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या प्रश्‍नांबाबत आपण यापुर्वीही आम्‍हाला दिलासा दिला आहे. आपण आम्‍हाला परमेश्‍वररुपी आहात. ना.राधाकृष्ण विखे पाटील हाच आमचा पक्ष आहे. आमच्‍या गावातील २० युवकांना आपण आपल्‍या संस्‍थांमध्‍ये कायमस्‍वरुपी सामावून घेतले. त्‍याच पध्‍दतीने उर्वरीत युवकांचेही पुनर्वसन आपण करावे. प्रकल्‍पग्रस्‍त शेतकऱ्यांच्‍या जमिनीच्‍या मोबदल्‍याबाबत आपणच आम्हाला न्‍याय मिळवून द्याल अशी अपेक्षा निळवंडे ग्रामस्‍थांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते ना.विखे पाटील यांच्‍याकडे व्‍यक्‍त केल्‍ाी.
विरोधी पक्षनेते ना.विखे पाटील यांनी आज निळवंडे गावास सदिच्‍छा भेट दिली. आणि ग्रामस्‍थांशी संवाद साधला. याप्रसंगी प्रकल्‍पग्रस्‍त शेतकऱ्यांनी आपल्‍या प्रश्‍नांबाबत विरोधी पक्षनेत्‍यांचे लक्ष वेधले. यापुर्वी निळवंडे गावातील २० तरुणांना आपण आपल्‍या संस्‍थांमध्‍ये कायमस्‍वरुपी नोकऱ्या देवून त्‍यांचे पुनर्वसन केले. याबद्दल ना.विखे पाटील यांचे ग्रामस्‍थांनी आभार मानले. 

मात्र धरणाखाली गेलेल्‍या आमच्‍या जमीनींचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही. काही युवकांना अद्यापही नोकऱ्या मिळणे बाकी आहे. याबाबत आपण जातीने लक्ष घाला. आपणच आम्‍हाला न्‍याय मिळवून देवू शकता. आपण आमच्‍यासाठी परमेश्‍वर रुपी आहात.ना. विखे हाच आमचा पक्ष आहे,अशा भावना भाऊसाहेब आभाळे यांच्‍यासह इतर शेतकऱ्यांनी व्‍यक्‍त व्‍यक्‍त केल्‍या.

विरोधी पक्षनेत्‍यांनी या शेतकऱ्यांचे प्रश्‍न जाणून घेतल्‍यानंतर प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या प्रश्‍नांबाबत यापुर्वी आपण पालकमंत्री असताना केलेल्‍या निर्णयांची माहीती या शेतकऱ्यांना सविस्‍तरपणे सांगितली. मात्र अद्यापही काही प्रकल्‍पग्रस्‍त शेतकऱ्यांचे प्रश्‍न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. याबाबत आपण व्‍यक्तिश: पाठपुरावा करुन न्‍याय मिळवून देवू,असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. 


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.