शिर्डीत ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरात सुरू असलेल्या पाच ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे मारून सुमारे नऊ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात २४ जणांवर जुगार प्रतिबंधक काद्यान्वये कारवाई करण्यात आली असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा व शिर्डीचे उपविभागीय अधिकारी डॉ. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवार दि. १८ रोजी संध्याकाळी शिर्डी शहरातील विविध पाच ठिकाणी कॉम्प्युटरवर, मोबाईलवर ॲप्सद्वारे पैशावर आकडे लावून बिंजो रोलेट नावाच्या (कसिनो) मटक्यांच्या अड्ड्यांवर छापे टाकले.

यात ४० संगणक, १ लॅपटॉप, १४ मोबाईल, ३ मोटारसायकली व रोख रक्कम ६३ हजार १३० असा ९ लाख ४५ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल व ऑन लाईन जुगार खेळण्याची साधने पोलिसांनी जप्त केली आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.