सामाजिक एकतेसाठी मंडळांनी कार्य करावे- संभाजी कदम.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महाराष्ट्रातील सर्वाच अबालवृद्धांचा आनंददायी उत्सव म्हणजे गणेशोत्सव. या उत्सवाची अनेकजण मोठ्या अतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे या उत्सवाची सुरुवात झाल्याने सर्वांत्र आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे. या उत्सवामुळे समाजात एकीची भावना निर्माण होत असते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरु झालेल्या या उत्सवात सामाजिक एकतेचे काम केले. हीच भावना मंडळांनी ठेवून सामाजिक एकता निर्माण करुन मंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन संभाजी कदम यांनी केले. 


माळीवाडा, कानडेगल्ली येथील समझोता तरुण मंडळाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ मंडळाचे अध्यक्ष तथा शहर बँकेचे संचालक शिवाजी कदम यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शक संभाजी कदम, उपाध्यक्ष प्रविण बेद्रे, अर्जुन बेद्रे, विष्णू थोरात, शेखर आढाव, विजय पटवेकर, संतोष तनपुरे, बापू खामकर, बाळासाहेब भुतकर, रामभाऊ शहाणे, वसंत शितोळे, रवि वडे, सागर थोरात आदि उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी कदम म्हणाले, समझोता तरुण मंडळ दरवर्षी गणेशोत्सवात धार्मिक व सामाजिक देखावे सादर करत असते. तसेच मंडळाच्या माध्यमातून वर्षभर वृक्षारोपण, आरोग्य शिबीरे, मोतिबिंदू शिबीर, लहान मुलांसाठी शिबीर असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. परिसरातील नागरिकांबरोबर शहरातील नागरीकांचाही त्यास मोठा प्रतिसाद मिळत असतो. यंदाच्या वर्षीही पारंपारिक वेषभूषेत श्रीगणेशाची मिरवणुक काढण्यात येणार आहे.

तसेच यंदा ‘महादेवाच्या लग्नाची वरात’ हा भव्य पौराणिक देशाखा साकारणार आहेत तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प आहे. तसेच मंडप अशा पद्धतीने टाकण्यात आला असून, त्यामुळे वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास दिपक थोरात, बाळासाहेब खामकर, गणेश टाकळकर, रोहन मुथा, स्वामी टाकळकर, राजू देशपांडे आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.