रेल्वेमार्ग प्रश्र मार्गी लावण्याचे खा.गांधी यांचे आश्‍वासन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दौण्ड - सिध्दटेक- कर्जत - चोंडी - जामखेड - पाटोदा- केज - अंबाजोगाई - घाटनांदूर परळी रेल्वेमार्गासाठी पत्रकार कृती समितीच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री खा. दिलीप गांधी यांना प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांच्या पूढाकाराने निवेदन देण्यात आले. सदर प्रश्‍नासंदर्भात पाठपुरावा करून, रेल्वे मंत्री सूरेश प्रभू यांच्या माध्यमातून या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही पत्रकारांच्या शिष्टमंडळास खा. गांधी यांनी दिली.

केंद्रीय रेल्वेमंत्री सूरेश प्रभू यांच्या नावे असलेले या रेल्वे मार्गाच्या मागणीचे निवेदन स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला पत्रकारांच्या कृती समितीने खा. गांधी यांना सूपूर्द केले. यावेळी जेष्ठ पत्रकार महेश देशपांडे महाराज, मिठ्ठूलाल नवलाखा, संतराम सूळ, यासीन शेख, तूकाराम अंदूरे आदि उपस्थित होते. निवेदनावर कर्जत, जामखेड तालुक्यातील विजयसिंह होलम, भूषण देशमुख, मोहनीराज लहाडे, इकबाल शेख, वसंत सानप, गणेश जेवेरे, आशोक निमोणकर, मच्छिंद्र अनारसे, निलेश दिवटे, मोहिद्दीन तांबोळी, अविनाश बोधले, अशिष बोरा आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.

कर्जत, जामखेड, पाटोदा, केज, अंबाजोगाई हा परिसर दूष्काळी आहे. या ग्रामीण भागाच्या विकासासाठी रेल्वेमार्ग गरजेचा आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. दौंड- सिद्धेटेक- चौंडी- जामखेड मार्गे परळी हा रेल्वेमार्ग रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा आहे. तसेच धार्मिक व पर्यटन क्षेत्रांना जोडणार्‍या या रेल्वेमार्गामूळे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी संपूर्ण देशाशी जोडले जाईल.

नूकतीच केंद्र सरकारच्या भारत बटालियन केंद्रास जामखेड तालुक्यात मान्यता मिळाली आहे. याबाबत सूध्दा हा रेल्वेमार्ग महत्त्वाचा ठरेल. स्वर्गीय गोपीनाथ मूंडे यांनी याबाबत ठाम आश्‍वासन दिले होते. अहमदनगर व बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिसराला वरदान ठरणार्‍या या रेल्वे मार्गाबाबत लोक अपेक्षा मोठ्या प्रमाणावर असून, आपण हा प्रश्‍न मार्गी लावाल अशी अपेक्षा रेल्वे मार्ग पत्रकार कृती समितीच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

दरम्यान मन्सूर शेख यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या शिष्टमंडळाशी खा. गांधी यांनी प्रदीर्घ चर्चा केली. गांधी म्हणाले स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना पत्रकारांनी चौंडी येथे निवेदन देतांना आपण त्याचे साक्षीदार होतो. हा रेल्वेमार्ग व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करू. यामार्गाच्या सर्वेक्षणासाठी प्रयत्न केले जातील.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.