चंद्रापूरात समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड व ग्रामपंचायत चंद्रापूर आयोजित "अध्यात्म आणि विज्ञान" या विषयावर समाजप्रबोधन कार्यक्रम चंद्रापूर येथे पार पडला.

एकीकडे बुध्दीच्या बळावर वैज्ञानिक क्षेत्रात मानवाने साधलेल्या अचाट प्रगतीचे चित्र दिसत असतानाच, दुसरीकडे भारतीय समाजात मात्र अध्यात्माच्या नावाखाली दिवसेंदिवस वाढत चाललेली अंधश्रध्दा, बुवाबाजी असे चित्र दिसते. भारतीय समाजाची मानसिकता दर्शवणाऱ्या या परस्पर विरोधी चित्रांमुळे 'अध्यात्म' आणि 'विज्ञान' यांच्यातील परस्पर संबंधाविषयी समाजाने पुन्हा नव्याने जाणून घेण्याची गरज आज निर्माण झाल्याचे जाणवते.

'अध्यात्म' म्हणजे स्वतःसंबंधीचा अभ्यास होय. यात देहापासून आत्म्यापर्यंतचा अभ्यास अपेक्षित आहे. 'विज्ञान' याचा अर्थ विशिष्ट ज्ञान किंवा विशेष ज्ञान होय. अनेक वेळा अनुभव घेऊन हे ज्ञान सिध्द होतं. आजचं विज्ञान विश्वामागची जी चालक शक्ती शोधण्याचं काम करत आहे, त्या शक्तीचा शोध भारतात फार प्राचीन काळीच अध्यात्माने 'ईश्वर' या नावाने घेतला होता. 

आध्यात्मिक भाषेत सगळया विश्वात एकच 'आत्मा' भरून राहिलाय हे जाणणं म्हणजे 'ब्रह्मज्ञान' होय असं मानतात.प्राचीनांनी कष्टाने कमावलेल्या ज्ञानाचा आधुनिक भारताच्या सर्वांगीण उन्नतीसाठी उपयोग करण्याची, प्राचीनांनी आध्यात्म व विज्ञानामध्ये साधलेला सुसंवाद लख्ख ज्ञानप्रकाशात एकदा लक्षात आला की आपोआपच संकुचित, क्षुद्र, दुराग्रही भूमिका गळून पडून आध्यात्म व विज्ञान परस्परांच्या विरोधात नसून, फार पूर्वीपासूनच भारतात मानवाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उपयोगात आणलेले दोन मार्ग आहेत हे लक्षात येण्यास वेळ लागणार नाही.असे मार्गदर्शन श्रीमती आशाताई खरडे यांनी केले.

अध्यक्षस्थानी सौ.सुकन्या तांबे होत्या.याविषयी कृषीदूत हेमंतकुमार तांबे, शेखर गुलदगड,सिद्धार्थ नेटवटे,राम नरसाळे,स्वप्निल काने यांना प्राचार्य डॉ.अरविंद हारदे उप. प्रा.दसपुते कार्यक्रम अधिकारी प्रा.मनोज माने व प्रा.पूजा राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.