बाजारू क्लासेसमूळे शिक्षण व्यवस्थेचा दर्जाच संपूर्णत: ढासळला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिक्षणाचा दर्जा ढासळण्यास बाजारू क्लासेस कारण आहेत. बाजारू क्लासेस चे आलेले अमाप पीक शिक्षणाचा मुलभूत उद्देश हरवून बसले आहेत. यातून शालेय स्तरावरच बालकांच्या भविष्याला सुरुंग लावला जात आहे. यातून शिक्षण व्यवस्था सांभाळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ डॉ.भरत करडक यांनी आज केले. स्नेहालय परीवारातील एकलव्य अभ्यास वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. करडक बोलत होते.

ते पुढे म्हणाले कि, प्राथमिक स्तरापासून अर्थात इयत्ता ४ थी पासून स्पर्धा परीक्षा यांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची तयारी केल्यास अधिकारी लवकरच तयार होतील. आगामी दशकात महाराष्ट्रात शासकीय भरती मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहेत. केंद्र आणि राज्य सरकारे उत्तम प्रशासक तयार करण्याच्या तयारीत आहेत. 

प्राथमिक स्तरावरून ,शालेय स्तरावरून स्पर्धा परीक्षा आणि सर्व विषयांची तयारी करून घेतल्यास अनेक विद्यार्थी तयार होतील. स्नेहालय परिवाराच्या प्रेरणेतून तयार झालेला एकलव्य अभ्यास वर्ग बाजारू क्लासेसला पर्याय आणि शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांच्या यशासाठी एकलव्य अभ्यास वर्ग विश्वासू ठरेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

स्नेहालय परीवाराच्या प्रेरणेतून नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथे कॅ. राजाभाऊ कुलकर्णी मार्ग येथील मनीष स्मृती सभागृहात हा एकलव्य अभ्यास वर्ग सुरु करण्यात आला आहे. सुरुवातीला इयत्ता ४ थी ते ७ वी या इयत्तासाठी चालणा-या या अभ्यास वर्गात सर्व विषयांचे सकाळी ७ ते ११ या वेळेत मार्गदर्शन केले जाणार आहे. या एकलव्य अभ्यास वर्गाचे प्रमुख संचालक अजित कुलकर्णी यांनी या वेळी हि माहिती दिली.

भारताचे संविधान आणि शिव खेरा लिखित "यश तुमच्या हातात" या पुस्तकांचे पूजन करून या एकलव्य अभ्यास वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आड अविनाश बुधवंत , सौ अनिता आणि अजित माने , सुभाष शिंदे ,सक्षम अकादमीचे डॉ.भरत करडक ,रामेश्वर फटांगडे , सौ.हेमलता आणि बाळासाहेब कुलकर्णी, स्नेहालय परिवाराचे संस्थापक गिरीश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

नगर शहरातील सेमी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता ४ थी ते ७ वी मध्ये शिक्षण घेणा-या सर्व मुला-मुलींनी या वर्गात प्रवेश घ्यावा. प्रवेश शुल्क अत्यंत अत्यल्प असले तरी मर्यादित प्रवेश दिले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी ९०११०२०१७४ किवा ९४२२२२४३८६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन स्नेहालय परिवाराने यावेळी केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.