देशभक्तीच्या सामुहिक परिणामामुळे देश स्वातंत्र झाला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :देशाला स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे, या ध्येयाने प्रेरित अनेक कुटूंबांनी स्वातंत्र्य आंदोलनात मोठा कारावास भोगला. हालअपेष्टा सहन केल्या, स्वत:च्या मालमत्ता - जमिनी नि:स्वार्थपणे देशार्पण केल्या, सरकारी नोकर्‍यावर पाणी सोडले, हा त्या वेळचा भारलेपणा, काळाचा, व्यक्तीचा, आंदोलनाचा, तीव्र देशभक्तीचा सामुहिक परिणाम होता, त्यात अनेकांच्या घराघराची राख रांगोळी देखील केली. या लढ्यात कामगार, कष्टकरींचा मोठा वाटा होता. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या महान व्यक्तींचे स्मरण करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी केले. 

जिल्हा हमाल पंचायत येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ठ कामगार रामदास बडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिव मधुकर केकान, शेख रज्जाक, बाळासाहेब वडागळे, लक्ष्मीबाई कानडे, सतीश शेळके, रावसाहेब दराडे, अशोक जायभाय, अनुरथ कदम, मोहन सापते, रोहिदास बनसोडे, बबन अजबे, नवनाथ बडे, संजय महापुरे, नारायण गिते, केरु वाबळे, किसन सानप, दत्तात्रय भोजणे, प्रल्हाद बोठे, लक्ष्मण वायभासे, रविंद्र भोसले, शेख म्हमूलाल, सुनिल गिते, पांडूरंग चक्रनारायण, भैरु कोतकर, रामा पानसंबळ, मच्छिंद्र दहिफळे आदि उपस्थित होते. 

पुढे बोलताना अविनाश घुले म्हणाले, आज हमाल, माथडी, कामगार हा देशाचा आधारस्तंभ आहे. देशाच्या विकासात या कष्टकरी वर्गाचे मोठे योगदान आहे, परंतु आजही हे लोक शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. देशाला स्वातंत्र मिळून 70 वर्ष झाली तर आजही हमाल, माथाडी, कामगारांचे प्रश्‍न सुटलेले नाही. त्यासाठी आता आर्थिक स्वातंत्र्याची लढाई लढण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी गोविंद सांगळे, रामदास बडे, बाळासाहेब वडागळे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय महापुरे यांनी केले तर आभार सतीश शेळके यांनी मानले. कार्यक्रमास माथाडी कामगार, हमाल, कष्टकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.