ऐतिहासिक नगर शहर तसेच ठेवायचे का ? डॉ.सुजय विखे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जनतेचे प्रश्‍न सुटण्याऐवजी त्यात वाढ होत आहे, पण बदल होत नाही. नगरच्या बाह्यवळण रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने तुम्ही इच्छित स्थळी लवकर जाऊ शकत नाही. उड्डाणपुलाला मुहूर्त नाही. ऐतिहासिक नगर शहर तसेच ठेवायचे का ? असा सवाल डॉ.सुजय विखे पा. यांनी उपस्थित केला. 


माजी उपनगराध्यक्ष स्व. कृष्णाभाऊ जाधव यांच्या जयंतीनिमित्त सर्वरोगनिदान शिबिरप्रसंगी आयोजित अभिवादन सभेत डॉ. विखे बोलत होते. तर, प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात सिने अभिनेते विजय पाटकर उपस्थित होते.

पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे पा. यांचे सहकारी स्व. कृष्णाभाऊ होते. विखे जाधव परिवाराचा ऋणानुबंध फार जुना आहे. मी जाधव परिवाराचा सदस्य म्हणून या ठिकाणी आलो आहे. ऍड. धनंजय जाधव यांनीही कृष्णाभाऊंचा समाजसेवेचा वारसा पुढे चालविला आहे. तो स्तुत्य असाच आहे. सध्याच्या महागाईच्या काळात रुग्णसेवा सामान्यांना परवडत नाही. वर्षातून एखादे शिबिर काही ठिकाणी होते, पण साईद्वारका, हेल्प मी इंडियामार्फत रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत मिळवून देणे, दर महिन्याला शिबिर तसेच विविध स्तरावर समाजकार्य ऍड. धनंजय जाधव व त्यांचा मित्रपरिवार करत असल्याचे डॉ. विखे म्हणाले.

सिनेअभिनेते विजय पाटकर यांनीही सामान्य जनांच्या जवळ जाऊन काम करणारे डॉ. सुजय विखे पा. व धनंजय जाधव यांसारखे उच्चशिक्षित तरुण आज समाजकारणात आहेत यामुळे देशाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी विश्‍वासराव आठरे पा., उबेद शेख, लक्ष्मणतात्या वाडेकर, आदींची भाषणे झाली. याप्रसंगी स्थायी समिती सभापती सुवर्णताई जाधव, भगवान फुलसौंदर, किशोर डागवाले, दीप चव्हाण, वसंत लोढा, अनिल बोरुडे, निखिल वारे, अजय औसरकर, मुन्नाशेठ चमडेवाले, राजूमामा जाधव, गणेश विद्ये, जालिंदर बोरुडे, दत्ताशेठ जाधव, सचिन गुलदगड, अन्वर सय्यद, जितेंद्र लांडगे, अभिमन्यू जाधव, चैतन्य जाधव, आदिनाथ जाधव, सोमनाथ जाधव, आदी उपस्थित होते.

यावेळी “आयुर्वेद’ या विषयावर विश्‍वमंगल आयुर्वेदचे डॉ. रहाणे यांचेही सर्वसामान्य रुग्णांना आयुर्वेदिक उपचारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. दिवसभर चाललेल्या सर्वरोगनिदान शिबिरात एक हजाराहून जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली. 

प्रारंभी स्वागत प्रास्ताविक साईद्वारका सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ऍड. धनंजय जाधव यांनी केले. शिबिरासाठी मितेश शहा, स्वप्निल दगडे, राहुल मुथा, पुरुषोत्तम सब्बन, तुकाराम रामगिरी, सोनू बोरुडे, महेश महादार, सचिन दिवाणे, राहुल गोंधळे, आकाश ताडला, रूपेश येनगुपटला, अनिल गोंधळे, माउली मेहेत्रे, अक्षय संभार, श्रीकांत उदगीरकर, बालाजी रामगिरी, संतोष उदगीरकर, आदींनी शिबिरासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. मितेश शहा यांनी आभार मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.