शेतकऱ्यांना तीव्र आंदोलन करावे लागेल - घनश्‍याम शेलार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करून स्वामिनाथन्‌ आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाल्याशिवाय शेतकरी अडचणीतून बाहेर पडणार नाहीत. त्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल, असे प्रतिपादन शिवसेना नेते घनश्‍याम शेलार यांनी केले.


तालुक्‍यातील दौंड-नगर रस्त्यावर बेलवंडी फाटा येथे अतुल वाजे, संतोष काळाणे, आकाश लबडे, वैभव मुठाळ, सागर जठार या तरुण शेतकऱ्यांच्या पुढाकाराने चक्काजाम आंदोलन केले; त्यावेळी शेलार बोलत होते. 

ते पुढे म्हणाले, शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्जबाजारी झाला असल्याने त्याला कर्जमुक्‍त करणे ही सरकारची जबाबदारी असून, भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्याचां सात-बारा कोरा करणे, स्वामिनाथन्‌ आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणीचे दिलेले शब्द त्यांनी आता पाळले पाहिजे; तरच शेतकरी संकटमुक्‍त होईल अन्यथा आणखी आत्महत्या वाढतील. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल. 

यावेळी भाऊसाहेब गोरे, प्रकाश निंभोरे, अतुल वाजे, संतोष काळाणे, आकाश लबडे, प्रदीप लबडे, मंगेश सूर्यवंशी, रघुनाथ सप्ताळ, शरद काळाणे, दादासाहेब काळाणे व वैभव मुठाळ यांची भाषणे झाली. मोठ्या संख्येने शेतकरी यावेळी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.