अनधिकृत चारी फोडण्याचे पालकमंत्र्याचे आदेश - कुकडीच्या अधिकार्याचा खुलासा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जत तालुक्यातून जाणार्या कुकडी चारीची येसवडी चारीला मोठे भगदाड पाडून काही दिवसापूर्वी दुर्गाव तलावाकडे पाणी वळण्याचा राजमार्ग कुकडीच्याच अधिकार्यांनी तयार केला यामुळे येसवडी चारीवरील शेतकर्यांना पाण्यापासून वंचित रहावे लागले असून चारी फोडण्यास पालकमंत्री यांनीच सांगितल्याचा खळबळजनक खुलासा कुकडीच्या अधिकार्याने कुळधरण परिसरातील नागरीकापुढे केला आहे. 


कर्जत तालुक्यातून जाणार्या कुकडी चारीची येसवडी चारी दुर्गाव तलावापासून थोड्या अंतरावर मोठे भगदाड पाडून फोडण्यात आली आहे एक ते दोन वर्षापूर्वीच कोट्यावधी रुपये खर्च करून या चारीच्या अस्तरीकर्णाचे काम करण्यात आले असून काम पूर्ण होताच हि चारी दुर्गाव तलावात पाणी सोडण्यासाठी अनधिकृत पणे फोडण्यात आली. 

यामुळे येसवडी चारीस पाणी जाणे शक्यच नव्हते या चारीचा लाभ होणार्या तळवडी, धालवडी, कुळधरण, बारडगाव या भागातील शेतकरी चिंताक्रांत बनले होते. यावेळी कुकडीत पाणी सोडल्यानंतर येसवडीचारीला पाणी सोडण्यात यावे व फोडलेल्या चारीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी कुळधरण ग्रामविकास संघटनेसह विविध गावच्या ग्रामस्थांनी केली होती व कुळधरण येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

त्यावेळी आंदोलकाशी चर्चा करताना कुकडीच्या अधिकार्यानीच हे कृत्य केल्याचे अभियंता साठे यांनी उघड केले. जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री ना राम शिंदे याच्या सांगण्यावरून हे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे ऐकून उपस्थितांना धक्काच बसला. यावेळी कुळधरण ग्रामविकास संघटनेचे सुधीर जगताप, बंडू सुपेकर, किरण जगताप, बापूराव सुपेकर, शामराव शितोळे, आदिसह अनेक शेतकरी उपस्थित होते. तुमचे शेतीचे भरणे करण्यासाठी पाणी देऊ ना असे उत्तर अधिकारी देत असताना येसवडी चारीला किती गेजने पाणी देणे आवश्यक आहे किती दिवस देणार आहात याप्रश्नाकडे मात्र अधिकारी दुर्लक्ष करत होते. 

तर ज्या भागात पुढारी असतात त्या भागात कसे करून पाणी मिळते मात्र जिकडे फक्त शेतकरी असतात तिकडे पाणी मिळत नाही असा आरोप करत शेतकर्यानी अधिकार्यास धारेवर धरले असता तुमचे भरणे होऊ पर्यंत पाणी देतो असे अधिकारी सांगत होते. अनधिकृत रीत्या चारी फोडून चारीवर खर्च झालेल्या पैशाचा अपव्यय झाला असून शेतकरीहि वंचित राहिला आहे त्याची चौकशी करण्यात यावी व दोषी वर कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.