नातलगांनी कामकाजात हस्तक्षेप केल्यास अपात्रतेचा प्रस्ताव.अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा नगरपंचायतीच्या नगरसेवकांच्या नातलग व हितसंबंधियांनी नगरपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये; अन्यथा अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल, अशी तंबी मुख्याधिकाऱ्यांनी नगरसेवकांना दिली आहे.

नेवासा शहरात नगरपंचायत झाल्याने शहराचा कायापालट होण्याची आशा नेवासकरांना आहे. मात्र, कामे होण्यास विलंब होत आहे. नगरसेवकांचे नातलग व हितचिंतक यांची नगरपंचायतीमध्ये गर्दी वाढली आहे. येथील कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या कामांसाठी अडचणी वाढत आहे.

काही राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांचे बडे कार्यकर्ते, बरोबरच नगरसेवकांचे हितचिंतक यांच्या हस्तक्षेपाने कामे करणे अवघड झाल्याने वैतागलेल्या मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी नगरपंचायत सदस्यांना नियमावर बोट ठेवून कामकाजातील हस्तक्षेप थांबविण्याची तंबी पत्राद्वारे दिली आहे.

याबाबत पाठविलेल्या पत्रात म्हटले की, नगरपंचायत कार्यालयात व कार्यालयाच्या कामकाजात आपले हितचिंतक यांचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत आहे. आपण आपल्या संबंधित हितचिंतक कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप करणार नाही, याची दक्षता घ्यावी. हस्तक्षेप केल्यास अथवा कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्यास शासन निर्णय व नगरपरिषद अधिनियमांमधील तरतुदीनुसार सदस्य अपात्र होऊ शकतो. 

आपण दखल न घेतल्यास आपणाविरुद्ध अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावा लागेल, असे पत्राद्वारे नगरसेवकांना नुकतेच कळविले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.