पालकमंत्र्यांना ध्वजारोहन करु देणार नाही .

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेतक-यांनी केलेल्या आत्महत्या नसून सरकारने केलेल्या हत्याच आहेत. या सरकारमधील मुख्यमंत्री व मंत्र्यांचे हात शेतक-यांच्या हत्येने रक्ताळलेली आहेत. अशा हत्या करण-या हातांना भारत देशाचा पवित्र तिरंगी झेंडा फडकविण्याचा कोणताही अधिकार नाही म्हणून पालकमंत्र्यांना ध्वजारोहन करु देणार नाही असे अवाहन ह.भ.प. अजय महाराज बारस्कर यांनी निवेदनाद्वारे केले आहे.शेतक-यांच्या विविध प्रश्नासंबंधीत जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. यानिवेदनाद्वारे संघटनेने सरकारवर ताशेरे ओढत 14 तारखेला चक्काजाम करण्याचा तसेच 15 ऑगस्टरोजी पालकमंत्र्यांना ध्वजारोहन करु देणर नसल्याचे म्हटले आहे.

शेतकरी संपाच्या माध्यमातून विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. याची परिणती म्हणून सरकारने नरमाईची भूमिका घेत अंशत: अनेक विषय पुर्ण करण्याची तयारी दाखविली होती.परंतु आता बरेच दिवस उलटूनही सरकारकडून अश्वासनापलीकडे काहीच मिळालेले नाही.म्हणून 14 ऑगस्ट रोजी विविधसंघटनांच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रभर चक्का जाम करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदार बच्चु कडू, रघनाथ दादा पाटील, बाबा आढाव, अजित नवले, शेतकरी समन्वय समिती, प्रहार संघटना, शेतकरी संघटना, जिल्हा हमालसंघटना, कामगार संघटना, किसान सभा, कम्यनिस्ट पार्टी,बळीराजा शेतकरी संघटना या सर्व संघटना येत्या 14 ऑगस्ट रोजी चक्काजाम आंदोलन करणार आहेत. 

सरकारने शेतक-यांना सरसकट कर्जमुक्ती दिलेली नाही. तसेच स्वामिनाथन आयोगात कुठलीही कार्यवाही केलेली नाही. त्याचबरोबर 9 ऑगस्ट 2017च्या मराठा क्रांती मोर्चामध्ये शेतक-यांच्या मागण्या संबंधी कोणतेही भाष्य केलेले नाही. म्हणून 14 ऑगस्ट रोजी संपुर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करणार आहोत. 

याचाच भाग म्हणून अहमदनगर शहरामधील मार्केटयार्डसमोरील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यााला अभिवादन करुन वरील सर्व संघटना चक्का जाम आंदोलन करणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे देशातील शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत.तसेच महाराष्ट्रातही शेतकरी आत्महत्या करतच आहेत. म्हणून या आत्महत्या नसून सरकारने केलेल्या हत्याच आहेत. असेच समस्त शेतक-यांचे म्हणने आहे. 

या सरकारमधील मुख्यमंत्री व मंत्र्यांचे हात शेतक-यांच्या हत्येने रक्ताळलेली आहेत. अशा हत्या करण-या हातांना भारत देशाचा पवित्र तिरंगी झेंडा फडकविण्याचा कोणताही अधिकार नाही. म्हणून तमाम शेतकरी बांधवांना विनंती आहे की, येत्या 15 ऑगस्टला होणरे शासकीय ध्वजारोहन पालकमंत्र्यांच्या हस्ते न करता ते ध्वजारोहन जिल्हाधिकारी, स्वातंत्र्यसैनिक किंवा शेतक-यांच्याहस्ते करण्यात यावे अशी तमाम संघटनांची मागणी आहे.

या आंदोलनामध्ये शेतकरी संघटनांनी विविध मागण्या सरकारपुढे मांडल्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. जुन 2017 पर्यंत शेतकरी सरसकट कर्ज मुक्त झाला पाहीजे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागु कराव्यात, पेरणी ते कापणी पर्यंतची सर्व कामे रोजगार हमीतून करण्यात यावी.शेतमालावरील संपूर्ण निर्यात बंदी उठविण्यात यावी. 

शेतकरी विधवांना पेन्शन व आत्महत्याग्रस्त पाल्यांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्यात यावे. हमाल, माथाडी, कामगार व अपंगांचे सर्व प्रश्न सोडविण्यात यावे. या मागण्या सरकारने तत्काळ पुर्ण कराव्यात अन्यथा हे आंदोलन यापुढेही उग्ररुप धारण करुन मोठ्या प्रमाणत मंत्रालयापर्यंत चक्काजाम करण्यात येईल. असे प्रहार वारकरी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, अजय महाराज बारस्कर यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.