माउलीच्या अनुकंपा,दया,करुणा क्षमाशीलता,सहनशीलता ह्या गुणाचे अनुकरण करावे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :माउलीच्या अनुकंपा,दया,करुणा,क्षमाशीलता,सहनशीलता ह्या गुणांचे अनुकरण केल्यास कुटुंबात आनंद निर्माण होतो.दयाळू मातेचा आज सन्मान करीत आहोत.तिच्यापासून आज प्रेरणा घेऊ या,कुटुंबात,समाजात,दयेने जगू या,वागू या असे प्रतिपादन श्रीरामपूर तालुक्यातील संत तेरेजा चर्च हरिगाव येथील लाखो सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या मतमाउली भक्तिस्थान येथील मतमाउली यात्राच्या शुभारंभ प्रसंगी पुणे धर्मप्रांताचे महागुरुस्वामी डॉ.थोमस डाबरे यांनी केले व डॉ डाबरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने यात्रेचा शुभारंभ झाला.


त्यापूर्वी मतमाउली मूर्तीची रथातून महागुरुस्वामी डॉ.थोमस डाबरे,हरिगाव धर्मगुरू पायस रॉड्रीक्स समवेत पदयात्रेने हजारो भाविकांची हरीगावातून मिरवणुक काढण्यात आली.अनेक ठिकाणी रांगोळी काढून,पाण्याचा सडा,पूजन करून स्वागत करण्यात आले.डॉ डाबरे पुढे म्हणाले की १९७० सालापसून यात्रा पाहतो तुमच्या भक्तीमुळे या भक्तीस्थानाचे महत्व दिवसेंदिवस वाढत असल्याने समाधान व्यक्त केले.अशीच भक्ती अखंड राहावी.माउली ही जगाची आई आहे,सर्ब धर्मीयांची.व मानवतेची आई आहे,माउलीकडे अनुकंपा, करुणा. दया, क्षमाशीलता, सहनशीलता हे गुण आहेत.ते गुण आपल्याकडे पाहिजे आहेत.त्याचे अनुकरण केले पाहिजे.

शुभारंभ प्रसंगी नोव्हेना प्रसंगी प्रमुख धर्मगुरू पायस रॉड्रीक्स,डॉमनिक रोझारीओ,रिचर्ड अंतोनी,ज्यो गायकवाड,जेम्स थोरात,आदी धर्मगुरू डोंगरावर व्यासपीठावर उपस्थित होते.शुभारंभानंतर यात्रेपर्यंत रोज विविध धर्मगुरु,,महागुरुस्वामी यांचे सायंकाळी पवित्र मारियाबद्दल प्रवचन राहील.

त्याचे नियोजन चर्चचे विविध विभाग करणार आहेत.शुभारंभप्रसंगी धर्मगुरू,धर्मभागिनी,भाविक ग्रामस्थ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्य यात्रा दि ९ सप्टे.रोजी संपन्न होणार असून दुसऱ्या दिवशी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.यात्रेच्या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन हरिगाव प्रमुख धर्मगुरू पायस रॉड्रीक्स यांनी केले आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.