नेवाशात ग्रामविकासासाठी जास्तीत जास्त निधी देऊ - ना.पंकजा मुंडे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा तालुका हा संतांच्या पावनभूमिचा असून तालुक्यात ग्रामविकासासाठी जास्तीत जास्त निधी देऊ, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी दिले. आहे. औरंगाबादहुन आष्टी येथे विशेष दौऱ्या निमीत्त जाताना नेवासा फाटा,सप्तपदी लॉन्स येथे कार्यकर्त्यांच्या भेटीच्या वेळी बैठकीत त्या बोलत होत्या.


तसेच पुढील महिन्यात नेवासा तालुक्यातील नेवासा ,उत्सळ,खरवंडी ,शिंगणापूर या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या उद्घाटनासाठी नेवासा दौऱ्यावर येण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी श्री संत भगवान बाबा यांची जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.बाळासाहेब मूरकुटे हे होते. तर व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हानेते रामदास गोल्हार ,भाजपा नेते रामकिसन गर्जे,राजेंद्र कीर्तने ,युवा नेते मयूर गोल्हार , शिवाजी शिरसाठ ,शशीकांत मतकर ,बाबासाहेब गोल्हार,डॉ.शिंदे ,डॉ.सांगळे ,डॉ.दहीफळे ,पोलीस कॉ.आव्हाड ,अमित फूलसौंदर ,ऋषीकेश सोनवने ,अक्षय गोल्हार ,शरद गोल्हार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.