विरोधकांमुळे पोलीस बंदोबस्तात काम करावे लागते ही शोकांतिका.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  मनपात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर नगर शहरातील मुलभूत व नागरी सुविधांच्या कामावर लक्ष केंद्रीत केले. या कामांना आडकाठी आणण्यासाठी विरोधकांनी कोणताच कसूर सोडला नाही. अखेर पोलीस बंदोबस्तात कामे पूर्ण करावी लागली. महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी सुरू असलेली कामे पोलीस बंदोबस्तात करावी लागतात, ही शोकांतिका असल्याचे महापौर सुरेखा कदम यांनी सांगितले. 

नगरसेविका आशा बडे यांच्या निधीतून प्रभाग चारमधील नागापूर सप्रे वस्तीवर बंद पाइल गटारीच्या कामाचा प्रारंभ कदम यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. माजी सभागृहनेते अशोक बडे, बाबूशेठ नागरगोजे, अंबादास कराळे, विष्णूपंत सप्रे, किशन सोनुले, पंढरीनाथ सप्रे, सचिन टेलर, संदीप सप्रे, विलास सप्रे, संग्राम गाडेकर, दिनेश वाघ, सुवर्णा सप्रे, जान्हाबाई सप्रे, भावना सप्रे, सुनील तनपुरे, सुनील साठे, नीलेश सुराणा, दिलीप पटेकर, बबन कोतकर, सुरेश साळवे, नामदेव शिर्के उपस्थित होते.

या बंद पाइप गटारीमुळे सांडपाण्याचा प्रश्न सुटणार आहे. प्रभागातील विकास कामे अनिलभैय्या राठोड यांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे बडे यांनी यावेळी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.