श्रीरामपूर तालुक्‍यातील तीन दुकाने आणि दोन बंद घरे फोडली.



अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर तालुक्‍यातील पढेगाव येथेतीन दुकाने आणि दोन बंद घरे फोडून लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लांबवण्यात आला. शनिवारी पहाटे पाचच्या दरम्यान ही चोरी झाली.

पढेगावात बाळासाहेब बनकर यांचेश्री स्वामी समर्थ मेडिकल दुकान आहे. या दुकानातील 10 ते 15 हजार रुपये तसेच इतर वस्तूंची चोरी झाली. त्या शेजारील ढगे यांचे कापड दुकान फोडण्यात आले. तेथून किती माल चोरीस गेला हे निश्‍चित समजू शकले नाही.

त्यानंतर नवलखा यांच्या किराणा दुकानाचेकुलुप तोडण्याचा प्रयत्न झाला. तो अयशस्वी झाल्यानंतर तेथून जवळच असलेल्या साहेबराव आहेर यांचे घर फोडण्यात आले. घरातील वस्तुंची उचकापाचक करण्यात आली. आहेर यांच्या घराजवळील विलास तुसे यांचे घर फोडून तेथूनही रोख रक्कम, दागिने तसेच इतर वस्तु चोरीस गेल्या.

तुसे दोन दिवसांपूर्वी पुणे येथे गेल्याने घर बंद होते. चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून आत प्रवेश करून उचकापाचक केली. तुसे यांच्या घरातून दोन तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट आणि रोख रक्कम चोरीस गेली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.