व्यापाऱ्याच्या गळयातील ५ तोळ्याची चेन लांबविली.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी चोरांनी ६५ वर्षीय व्यावसायिकाच्या गळ्यातील ५ तोळे वजनाची सोन्याची चेन बळजबरीने हिसकावून चोरुन नेली. ही घटना तारकपूर येथील किशोर किराणा स्टोअर्स या दुकानात गुरुवारी (दि.१०) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबतची माहिती अशी की, तारकपूर येथील कमलेश मोहरीलाल कंत्रोड (वय ६५) हे त्यांच्या किशोर किराणा स्टोअर्स या दुकानात बसलेले असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी कंत्रोड यांच्याकडून चॉकलेट विकत घेतले. चॉकलेट विकत घेतल्यानंतर त्यांनी कंत्रोड यांना लेमन गोळ्याची मागणी केली. कंत्रोड यांनी त्यांना लेमनच्या गोळ्या दिल्या.

त्या दोघांनी लेमनच्या गोळ्याचे पैसे कंत्रोड यांच्याबरोबर काऊंटरवर ठेवले. कंत्रोड हे पैसे घेण्यासाठी थोडे पुढे झुकले असता चोरट्यांनी याचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील ५ तोळे वजनाची सोन्याची चेन बळजबरीने घेऊन पसार झाले. कंत्रोड यांनी आरडाओरड केली परंतु तोपर्यत चोरटे पसार झाले. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सोने हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.