नगरच्या लष्करी हद्दीत घुसखोरी चौघे ताब्यात


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भारतीय लष्कराच्या हद्दीत भटकणाऱ्या चौघा तरुणांना गुरुवारी रात्री जवानांच्या मदतीने पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर हेरगिरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेले तरुण उस्मानाबाद जिल्ह्यातील असून या घटनेने खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दैलसा मक्सुम शेख, ख्वाजा मक्सुम शेख (रा. जेवळी, लोहरा, जि. उस्मानाबाद), शहनवाज इस्माईल कुरेशी (रा. नळदुर्ग, तुळजापुर), कारभारी इम्राण मुस्तफा (रा. सय्यद हिवर्गा, जि. उस्मानाबाद) हे चौघे तरूण गुरुवारी, दि. १० रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास लष्कराच्या फायरिंग क्षेत्रात फिरत असल्याचे जवानांना दिसले.

जवानांनी तरुणांना ताब्यात घेवून विचारपूस केली. या भागात प्रवेश नसताना तुम्ही इकडे कसे आलात अशी विचारणा त्यांच्याकडे केली असता नोकरीनिमित्त नगरला आलो असून भिंगारमध्ये राहतो, असे उत्तर त्या तरूणांनी दिले. तसेच धार्मिक विधी आटपून परतत असताना दिशाभूल झाल्याने इकडे पोहचलो असे उत्तर या तरुणांनी दिले. 

त्यांची नावे विचारून जवानांनी त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतले. चार ते पाच तास जवानांनी या तरुणांकडे चौकशी केली. त्यातील एका तरुणाच्या मोबाईलमध्ये एक संशयीत व्हॉटसॲप ग्रुप मिळून आला. त्यामुळे या तरुणांना भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.