अतिक्रमण हटावमध्ये मनपाकडून भेदभाव.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अतिक्रमण हटाव मोहिमेद्वारे सर्वसामान्य टपरीचालक व पाथरीवाल्यांना त्रास देण्याचे धोरण महापालिकेकडून अवलंबविले जात आहे. तर मोठ्या व श्रीमंत अतिक्रमण धारकांना प्रशासनाकडून पाठिशी घातले जात आहे. हे दुटप्पी धोरण सोडून अतिक्रमण हटाव विभागाने हातावर पोट असलेल्या गरिबांवर अन्याय न करण्याची मागणी इंद्रायणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश चिपाडे यांनी केली आहे.

याबाबत बालिकाश्रम रोडसह शहरातील टपरीचालक व पाथरीवाल्यांनी महापालिकेचे आस्थापना विभागप्रमुख एम. जी. लहारे यांना निवेदन देऊन भावना व्यक्त केली. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. चिपाडे, योगेश जगदाळे, काळू दळवी, स्वप्नील अडसुळ, बासीद तांबटकर, भैय्या होंडे, भाऊ लेंडकर, सुरज राणा, कार्तिक भगत, बाळू पतंगे, भरत चिपाडे, भैय्या गोरे, गाटू जगदाळे आदिंसह टपरीचालक व पाथरीवाले उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या बालिकाश्रम रोडसह संपूर्ण नगर शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण हटाव मोहिम पालिकेने हाती घेतली आहे. मात्र त्याचवेळी शहरातील मोठ्या व्यवसायिक इमारती व रुग्णालयांच्या पार्किंगची जागा फस्त केलेल्या बड्या व्यवसायिकांवर कारवाई न करण्याचे दुटप्पी धोरण पालिकेने अवंलंबिले आहे. याचाच अर्थ पालिका अतिक्रमण हटाव मोहिमेतही गरिब-श्रीमंत असा भेदभाव करीत आहे. हातावर पोट असणार्‍या पाथरीवाले टपरीचालकांना एक न्याय व बड्या मंडळींना दुसरा न्याय देणे चुकीचेच आहे. 

टपरीचालकांवर अन्याय करून त्यांची रोजी-रोटी हिसकावून घेण्याचाच हा प्रकार असून, पालिका प्रशासनाने या गरिब पाथरीचालक टपरीवाल्यांवरील अन्याय धोरण थांबवावे. पालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांकडून आरेरावी केली जात असल्याने याबद्दल आम्ही संघटीतपणे हे निवेदन देत आहोत. याची दखल घेऊन गरिब टपरीचालक व पाथरीवाले व्यवसायिकांना पालिकेने अभय न दिल्यास याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.