आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये 160 रुग्णांची मोफत मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दुबळ्या घटकातील रुग्णांच्या वेदना दूर करण्याचे काम आनंदऋषीजी हॉस्पिटल करत आहे. मानवसेवा या निष्ठेने संस्थेचे कार्य चालू आहे. सर्वसामान्यांना वैद्यकिय खर्च पेळवत नसून, या रुग्णांना आधार देण्याचे काम हॉस्पिटलच्या माध्यमातून चालू आहे. शहरामध्ये अनेकांकडून आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या उत्तम सेवेची माहिती मिळत असून, हीच या कामाची खरी पावती असल्याची भावना प्र. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पांडूरंग बुरुटे यांनी व्यक्त केली. 


राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषी म.सा. यांच्या 117 व्या जयंती निमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्व.श्रीमती सुशीलाबाई लखमीचंद बोथरा यांच्या स्मरणार्थ बोथरा परिवाराच्या सहकार्याने आयोजित मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी व उपचार शिबीराच्या उद्घाटना प्रसंगी बुरुटे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरपीआयचे अजय साळवे, भारीपचे सुनिल शिंदे, डॉ.प्रकाश कांकरीया, डॉ.आशिष भंडारी, अजित बोथरा, सतीश बोथरा, सौ.प्रतिभा बोथरा, परेश बोथरा, माणकचंद कटारीया, डॉ.मनोहर पाटील, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, डॉ.वसंत कटारिया, डॉ.राजेंद्र गिरी, डॉ.दत्तात्रय अंदुरे आदि उपस्थित होते.

प्रास्ताविकात वसंत कटारीया म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये वंचितांच्या व्याधीमुक्तीचे महायज्ञ चालू आहे. या मानवरुपी ईश्‍वरसेवेला अनेकांचे हातभार लागत आहे. झालेला आजार गरीब किंवा श्रीमंताना सारखाच असतो. मात्र आर्थिक परिस्थिती अभावी कोणीही वैद्यकिय सेवेपासून वंचित राहू नये. यासाठी या हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्यल्पदरात वैद्यकिय सुविधा पुरविली जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

तसेच या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेले स्पेशालिस्ट डॉक्टर व अद्यावत वैद्यकिय सुविधांची माहिती दिली. अजय साळवे म्हणाले की, सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांचा आनंदऋषीजी हॉस्पिटल केंद्रबिंदू झाला आहे. वंचितांना खर्‍या अर्थाने आधार मिळून, नवजीवन देण्याचे कार्य येथे चालू आहे. मानवसेवा हीच ईश्‍वरसेवा हे ब्रिदवाक्य या कार्याला सार्थ ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

या शिबीरात 160 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये डॉ.वसंत कटारिया, डॉ.प्रविण डुंगरवाल, डॉ.राजेंद्र गिरी, डॉ.दत्तात्रय अंदुरे यांनी रुग्णांची तपासणी केली. उपस्थितांचे आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले. उद्या शुक्रवार दि.4 ऑगस्ट रोजी प्रोस्टेट ग्रंथी, मुतखडा, लघवीच्या विकार संबंधी तपासणी व उपचार शिबीर होणार असून, याचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 

ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर Add करा 9146410937 हा आमचा नंबर, 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.