गणेशमुर्ती बनविण्याच्या कार्यशाळेतून कला व पर्यावरण रक्षणाचा संदेश

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आज काल मुलं ही मोबाईल गेम, कॉम्प्युटर्स, इंटरनेटच्या आहारी जात आहेत. त्यामुळे त्यांच्यात एकलकोंडेपणा वाढत आहे. भारतीय संस्कृती, सण, उत्सव यांचे महत्व आणि त्याची उपयुक्तता या विषयी त्यांच्या अज्ञान पहावयास मिळते. प्रत्येक मुलांत काही तरी कला-गुण असतात, परंतु त्या कला-गुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. 


त्याच्यातून त्याची बौद्धीक क्षमता वाढीस लागते, सामाजिक भान निर्माण होते. याच उद्देशाने गणेशोत्सवानिमित्त गणेशमुर्ती बनवा कार्यशाळेच्या माध्यमातून मुलांतील कलाकार जागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कला आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देऊन त्यांच्या कला-गुणांना वाव मिळाला आहे, असे प्रतिपादन कलर्स ड्राईंग अ‍ॅकॅडमीचे संचालक सागर उर्किडे यांनी केले.

गुलमोहोर रोडवरील कलर्स ड्राईंग अ‍ॅकॅडमीच्यावतीने पर्यावरणपुरक गणेशमुर्ती बनवा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संचालक सागर उर्किडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुलांनी सहभाग घेऊन आकर्षक गणेशमुर्त्यां तयार केल्या. 

मुलांनीही आपआपल्या बुद्धी चातुर्याने श्रीगणेशास आकार देण्याचा प्रयत्न केला, माती, पाणी, चिखल यात मुलं दंग होऊ गेली होती. त्यांच्यातील कलाकार आपली कलाकुसर सादर करत श्रीगणेश तयार झाल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळा आनंद निर्माण झाला होता. पालकांनीही मुलांनी बनविलेल्या श्रीगणेशाचे कौतुक केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.